पुरस्कार कमी पडेल असे कार्य नानासाहेब धर्माधिकारी यांचे आहे; सचिन सावंत
गुहागर, ता. 18 : महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉ. ति. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य एवढे महान आहे की त्यांना पुरस्कारही कमी पडेल. तसेच त्यांच्या प्रतिष्ठानचे कार्यही महान आहे, असे प्रतिपादन गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी केले. आरे ग्रामपंचायत मध्ये डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेच्या अनावरण सोहळाला ते बोलत होते. Unveiling ceremony of Nanasaheb Dharmadhikari statue
डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांचा मीही जवळचा भक्त आहे. या प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम यासारखे समाज उपयोगी कार्य करत असतात. आपली मानसिक शारीरिक स्वास्थ जपणे गरजेचे आहे ते काम बैठकीच्या निरूपणा मधून केले जाते. या श्री समर्थ सदस्यांनी गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता करण्याचेही आव्हान त्यांनी केले. या बैठकीतून अनेक जण सुधारलेले आहेत. या बैठकीतील एक वाखणण्यासारखी यासारखी गोष्ट म्हणजे बैठकीचा कोणताही कार्यक्रम असला तरी शेवटच्या माणसाचं भाषण संपेपर्यंत येथील एकही माणूस हलत नाही, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी श्री सदस्यच असतात ही शिस्त बैठकीची आहे. या बैठकीमुळे चांगल्या प्रकारचे संस्कार सदस्यांवर घडत असतात असे सुरेश सावंत यांनी सांगितले. Unveiling ceremony of Nanasaheb Dharmadhikari statue
या कार्यक्रमाला सरपंच समित घाणेकर, उपसरपंच विठ्ठल धावडे, सुरेश सावंत, श्रीकांत महाजन, शशिकांत महाजन, प्रकाश सावंत, मनोज बावधनकर सर्व ग्रामपंचायत सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला श्री समर्थ सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. Unveiling ceremony of Nanasaheb Dharmadhikari statue