आंबा, काजू पीक धोक्यात; शेतकरी चिंतेत
गुहागर, ता. 17 : उन्हाच्या काहिलीने नागरिक त्रस्त असताना मंगळवारी मध्यरात्री ढग दाटून आले आणि विजा चमकून अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे अल्प फळधारणा झालेल्या आंबा, काजू पिकाला धोका निर्माण झाला असून तालुक्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे. Unseasonal rain in Guhagar
यंदाच्या हंगामात सलग तिसऱ्यांदा अवकाळी पावसाचा फटका गुहागर तालुक्यातील बागायदारांना बसला. मुळात मोहोरासाठी आवश्यक थंडी न पडल्याने आंबा व काजु उशिरा मोहरला होता. परंतू पहिल्या अवकाळी नंतर थ्रीप्स रोगाची लागण झाल्याने पहिले आंबा पीक हातातून गेले. त्यानंतर आत्ता कुठे दुसऱ्या टप्प्याती आंबा पिक हातात येऊ लागले तर परत पाऊस पडल्याने आंबा बागायतदार शेतकर्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हापूस पिकावर तालुक्याचे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर चालते. तालुक्यातील अनेक बागायतदार वर्षभर मेहनत करतात. लाखो रुपयांची औषधे फवारतात. अवकाळीमुळे या बागायतदारांच्या वार्षिक उत्पन्नावर फार मोठा परिणाम झाला आहे. Unseasonal rain in Guhagar
उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काही अंशी का होईना उष्णतेपासून दिलासा मिळाला. तापलेल्या उन्हाने उष्णतेचे सर्व विक्रम मागे टाकत सर्वाधिक तापमानाची नोंद केली असताना सोमवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणात ढग दाटून येऊन अचानक बदल झाले. रात्री बारा वाजता विजांचा लखलखाट करत पावसाने हजेरी लावली. हापूस आंबा तयार होत असताना तालुक्यात पावसाने अचानक लावलेल्या हजेरीने शेतकरी चिंतातूर झाले असून, आधीच यावर्षी उत्पन्नाचे प्रमाण अत्यल्प असताना या पावसामुळे तेही वाया जाणार असल्याने शेतकरी गर्भगळीत झाला आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात काल सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार यांचे अतोनात नुकसान झाले आहे. रात्री बारा वाजता पावसाने सुरुवात केल्यानंतर काही मिनिटातच महावितरण चे अनेक गावांमध्ये रात्रभर वीज गायब झाली होती. सर्वत्र उष्म्याने लाही -लाही होत असताना सकाळी उठल्यावर वीज नसल्याने पाणी ही नव्हते. एकूणच या पावसामुळे सर्वांची पळापळ झाली. Unseasonal rain in Guhagar