केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल; पाण्याबाबत जनजागृती आवश्यक
गुहागर, ता. 07 : स्वच्छ भारत अभियानात आपण मिळवलेले यश निश्चित कौतुकास्पद आहे. मैला गाळ व्यवस्थापन हा नवा विषय रत्नागिरीने हाती घेतला आहे. गाव पातळीवर हा प्रयोग यशस्वी केल्यास आपल्या जिल्ह्याचे उदाहरण देशासमोर ठेवता येईल. त्यामुळे या प्रकल्पाबाबतचा संपूर्ण अहवाल, ग्रामपंचायतीकडून हा प्रकल्प कसा चालविला जात आहे याची माहिती मला द्यावी. असे प्रतिपादन जलशक्तीचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केले. ते रत्नागिरी जिल्ह्याच्या आढावा बैठकीत बोलत होते. Union Minister of State Patel reviewed Ratnagiri district
गुहागरच्या दौऱ्यावर असलेल्या राज्यमंत्री पटेल यांच्या उपस्थितीत आज रत्नागिरी जिल्ह्यातील जल जीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान या उपक्रमांची आढावा बैठक हॉटेल शांताई येथे झाली. या बैठकीमध्ये जिल्हा परिषद रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात 4 लाख 49 हजार 664 घरे आहेत. यापैकी 2 लाख 73 हजार 332 घरांमध्ये नळद्वारे पाणी पुरवले जाते. 1 लाख 76 हजार 332 घरांपर्यंत पाणी पोचविण्याचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी 26 हजार 20 घरांमध्ये नळ जोडणी देण्यात आली आहे. 1 लाख 50 हजार 312 घरांपर्यंत नळ जोडणी देणे बाकी आहे. जल जीवन मिशन अंतर्गत 9 तालुक्यात 1353 योजनांचा विकास आराखडा (Development plan) झाला असून या योजनांच्या कामांचे आदेशही देण्यात आले आहेत. स्वच्छ भारत अभियानात राष्ट्रीय पातळीवर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओडीएफचे 94 टक्के काम पूर्ण आहे. 347 सार्वजनिक शौचालये बांधण्याचे उद्दीष्ट 2022-23 करीता आम्ही ठेवले आहे. रत्नागिरी तालुक्यातील नाचणे येथे प्रायोगिक तत्त्वावर गोवर्धन हा प्रकल्प उभा केला आहे. तसेच मैला गाळ व्यवस्थापनाचा प्रकल्पही दोन तालुक्यात उभा केला आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनामध्ये 1532 महसुली गावांपैकी 1516 गावांचा विकास आराखडा पूर्ण झाल्याचे पुजार यांनी सांगितले. Union Minister of State Patel reviewed Ratnagiri district
आढावा सभेचा समारोप करताना पटेल म्हणाले की, खरतरं पाणी हा विषय राज्यांचा आहे. मात्र राज्या राज्यांमध्ये पाण्यावरुन वाद घडु लागल्याने केंद्र सरकारला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. भविष्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होणार आहे. देशात 25 वर्षांनंतर प्रति व्यक्ती 1000 लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक राहील असा अंदाज संशोधक व्यक्त करत आहेत. आजपासून पाण्याच्या प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी प्रयत्न केला नाही तर आपल्या मुलांना पाणी कुठून मिळणार याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणी वाचवणे, फुकट जाणारे पाणी उपयोगात आणणे, पावसाचे पाणी अडवून त्याची साठवणूक करणे अशा वेगवेगळ्या विषयात वेगाने काम करण्याची आवश्यकता आहे. जलसंवर्धन हा विषय आता फक्त सरकारी न रहाता संपूर्ण समाजाचा झाला पाहीजे. जलसाक्षरतेविषयी सामान्य जनतेमध्ये जागरुकता निर्माण झाली पाहीजे तरच भविष्य काळात पुढच्या पिढीला पाण्याची उपलब्धता होईल. Union Minister of State Patel reviewed Ratnagiri district
या आढावा सभेला आमदार प्रशांत ठाकूर, धैर्यशील पाटील, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी प्रविण पवार, गुहागरचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, 9 तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जल जीवन मिशनचे अधिकारी, भाजपचे जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे, उपाध्यक्ष दिपक महाजन, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे आदी उपस्थित होते. Union Minister of State Patel reviewed Ratnagiri district