• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 November 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भारताचा युरोपसोबतचा वैज्ञानिक सहभाग दृढ होणार

by Guhagar News
November 12, 2026
in Bharat
17 0
0
33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह इटलीला रवाना

विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन, अणुऊर्जा तसेच अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह इटलीच्या 3 दिवसीय अधिकृत दौऱ्यासाठी रवाना झाले. भारताचा युरोपसोबतचा वैज्ञानिक सहभाग अधिक दृढ करणे आणि विज्ञान, तंत्रज्ञान व नवोन्मेष क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय भागीदारी पुढे नेणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे. Union Minister Dr. Singh leaves for Italy

भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे केंद्रीय मंत्री अंतराळ, एरोस्पेस आणि संशोधन सहकार्य या विषयांशी संबंधित इटलीच्या मंत्र्यांसह चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठका, रोम येथे दुसरा भारत-इटली विज्ञान आणि नवोन्मेष संवाद 2026 तसेच ट्रिएस्टे येथील प्रमुख वैज्ञानिक संस्थांशी संवाद यांचा समावेश असेल. संशोधन, धोरणात्मक तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी या दौऱ्यामुळे व्यासपीठ उपलब्ध होईल. Union Minister Dr. Singh leaves for Italy

12 नोव्हेंबर रोजी रोम येथे होणाऱ्या दुसऱ्या भारत-इटली विज्ञान आणि नवोन्मेष संवाद 2026 मध्ये दोन्ही देशांतील प्रमुख वैज्ञानिक संस्था, संशोधक, नवोन्मेष क्षेत्रातील भागधारक आणि तंत्रज्ञान इनक्युबेटर्स सहभागी होतील. संशोधनातील उत्कृष्टता आणि धोरणात्मक तंत्रज्ञान, संशोधनाचे नवोन्मेषात रूपांतर, संस्थात्मक भागीदारी अधिक दृढ करणे आणि भविष्यातील सहकार्यासाठी संयुक्त कृती आराखडा विकसित करणे या विषयांवर या संवादात भर दिला जाईल. Union Minister Dr. Singh leaves for Italy

डॉ. जितेंद्र सिंह इटलीच्या विद्यापीठ आणि संशोधन मंत्री अन्ना मारिया बेर्निनी तसेच अंतराळ आणि एरोस्पेस धोरणाची जबाबदारी असलेले मंत्री अडोल्फो उर्सो यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेतील. या बैठकांमुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन तसेच परस्पर हिताच्या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये भारत-इटली सहकार्य पुढे नेण्याची संधी मिळेल.

13 नोव्हेंबर रोजी ट्रिएस्टे येथील केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमात इलेक्ट्रा सिंक्रोट्रॉन सुविधा, अब्दुस सलाम आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकशास्त्र केंद्र (आयसीटीपी) आणि आंतरराष्ट्रीय जनुकीय अभियांत्रिकी आणि जैवतंत्रज्ञान केंद्र (आयसीजीईबी) यांना भेटी देण्याचा समावेश आहे. या भेटींमुळे वैज्ञानिक सहकार्य, संशोधन पायाभूत सुविधांमधील भागीदारी आणि संशोधकांसाठी परस्पर देवाणघेवाणीच्या संधींचा शोध घेता येईल.

या दौऱ्यात रोम येथील भारतीय समुदायाशी संवाद साधणे आणि 14 नोव्हेंबर रोजी भारतीय दूतावासात जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणे यांचाही समावेश असेल. Union Minister Dr. Singh leaves for Italy

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarUnion Minister Dr. Singh leaves for Italyटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.