हर घर तिरंगा अभियानांतर्गत जनजागृती
गुहागर, ता. 27 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ न.१ च्या विद्यार्थ्यांनी शालेय व्यवस्थापन कमिटी आणि पालक वर्गाच्या सहकार्याने शाळेची जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Umrath School took out Prabhat Feri

गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नं.१ च्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय, माझा तिरंगा माझ्या मनाचा राजा, माझे घर माझी शान, माझा तिरंगा माझा अभिमान…. अशा घोषणा देत गावातील वाडीवस्ती दुमदुमून टाकली. यावेळी गावातील नागरिकांनी स्वप्रेरणेने हर घर तिरंगा अभियानात सहभागी होऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन करण्यात आले. Umrath School took out Prabhat Feri

या शिवाय हर घर तिरंगा अभियानांतर्गत शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. यात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आणि पालक सभा घेण्यात आल्या. वकृत्व स्पर्धेच्या वेळी स्व:त सरपंच जनार्दन आंबेकर उपस्थित होते. या सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप रामाणे, पदवीधर शिक्षक श्री अनिल अवेरे, उपशिक्षिका सौ. प्रियांका कीर, सौ. सायली पालशेतकर, पोषण आहार स्वयंपाकी/मदतनीस सौ. वैष्णवी पवार, सौ. सानिका पवार या सर्वांचे सहकार्य लाभले. जनजागृती प्रभात फेरीचे नियोजन अनिल अवेरे आणि शिक्षकवर्गाने केले. तर मुख्याध्यापक श्री. प्रदीप रामाणे यांनी सर्वांचे आभार मानून समारोप केला. Umrath School took out Prabhat Feri
