गुहागर, ता. 18 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नंबर १ या शाळेमध्ये शनिवार दिनांक १५ जून २०२४ रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारात नवागतांचे फुलाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. या पहिल्याच दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. Umrath School Entrance Festival
सर्वप्रथम शाळेचे पदवीधर शिक्षक अनिल अवेरे सर यांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश नाटेकर सर यांनी उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहारात मुलांना गोड खाऊ देण्यात आला. तसेच उमराठ गावातील एक जेष्ठ ग्रामस्थ नामदेव पवार यांनी सुद्धा शाळेतील सर्व मुलांना खाऊ दिला. Umrath School Entrance Festival
सदर कार्यक्रमाच्या वेळी ग्रामपंचायत उमराठ मार्फत शाळेसाठी आवश्यक असलेले एल ई डी टीव्ही आणि वॉटर कुलर देण्यात आला. त्याबद्दल ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर, उपसरपंच सुरज घाडे आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे यांचेही मुख्याध्यापक प्रकार नाटेकर सर यांनी आभार मानले. शेवटी शाळेचे शिक्षक अनिल अवेरे सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. Umrath School Entrance Festival
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. श्रीकांत कदम, उपाध्यक्षा सौ. अस्मिता गावणंग तसेच शाळा व्यवस्थापन समिती मधील सदस्य उदय गावणंग, वर्षा गावणंग, पुनाजी गावणंग, संचिता गुरव, सानिका पवार, प्रणिता गावणंग, संजना गावणंग, दीपिका घाडे, अंजली गावणंग, श्रुती कदम, योगिता कदम, रुचिता कदम, रूपाली घाडे, अंगणवाडी सेविका सौ. वर्षा पवार, मदतनीस समृद्धी गोरीवले इत्यादी सदस्य उपस्थित होते. Umrath School Entrance Festival