गुहागर, ता. 28 : तालुक्यातील मौजे उमराठ या गावी सरपंच जनार्दन आंबेकर यांनी ग्रामपंचायत उमराठच्या माध्यमातून खास शेतकर्यांसाठी शुक्रवार दि. २१.०४.२०२३ रोजी आधुनिक सेंद्रिय शेती विषयक कार्यशाळेचे आयोजन केले होते. शेतकर्यांनी पारंपारिक पद्धतीच्या शेतीतून हळूहळू बाहेर पडून सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे तसेच नोकरी-धंद्यासाठी शहरी भागाकडे जाणारा तरूणांचा लोंढा सुद्धा आधुनिक सेंद्रिय शेतीकडे वळला पाहिजे, असा या सेंद्रिय शेती कार्यशाळेचा/ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. असे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. Umrath farmers will do organic farming
सदर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर साहेब, कृषी पर्यवेक्षक संजय सानप व कृषी सेवक सतीश सपकाळ आले होते. सुरुवातीला कार्यशाळे संदर्भात प्रस्तावना ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे यांनी केली व सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि शेती विषयक खास पुस्तिका देऊन मार्गदर्शक अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. Umrath farmers will do organic farming
या पुर्वी कृषी अधिकारी मंदार जोशी, सागर आंबवकर आणि कृषी सेवक सतीश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उमराठ येथे परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती अंतर्गत एका गटात किमान २० शेतकरी व गटाचे क्षेत्र ५० एकर असे उमराठ गावात एकूण चार सेंद्रिय शेती उत्पादक गट तयार करण्यात आले आहेत. सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री देव भराडा सेंद्रिय शेती उत्पादक गट, महेश गोरिवले यांच्या अध्यक्षतेखाली श्री नवलाई देवी सेंद्रिय शेती उत्पादक गट, नामदेव पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवराई सेंद्रिय शेती उत्पादक गट आणि भिकू मालप यांच्या अध्यक्षतेखाली वनराई उत्पादक गट असे चार गट आहेत. Umrath farmers will do organic farming
जमिनीची सुपीकता वाढविणे, शेतकऱ्यांचे बाहेरून निविष्ठा खरेदी करण्याचे प्रमाण कमी करून आवश्यक निविष्ठा शेतावरच तयार करणे, उत्पादन खर्च कमी करून निव्वळ नफ्यात वाढ करणे, मानवी वापरासाठी नैसर्गिक व पौष्टिक आहार मिळवून देणे आणि रासायनिक खते व औषधे यांचा वापर कमी करणे. असे सदर कार्यशाळेत परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती उत्पादक गटाची उद्दिष्टे सांगताना तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर यांनी सांगितले. Umrath farmers will do organic farming
हिरवळीचे खत
धैंचा हे खत जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढविते, मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढविते, मातीच्या भौतिक रासायनिक व जैविक पोतात किंवा वातावरणात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही तसेच मातीत फायदेशीर सूक्ष्म जिवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढविते. शिवाय एस ९ कल्चर – कल्चर म्हणजे जिवाणूंचे मिश्रण. सदर कल्चर वापरल्याने सेंद्रिय पद्धतीने खत लवकर तयार होते. तसेच CPP कल्चर – एस ९ कल्चर तयार करण्यासाठी या कल्चरचा उपयोग केला जातो. यामुळे शेतकरी शेतावरच एस ९ कल्चर तयार करू शकतात. असेही त्यांनी सांगितले. Umrath farmers will do organic farming
या कार्यशाळेत द्रवरूपी सेंद्रिय निविष्ठा दशपर्णी अर्क, जीवामृत, अमृतपाणी इत्यादी शेतावरच तयार करता यावेत, यासाठी प्लास्टिक ड्रमचे वाटप तसेच हिरवळीचे खत – धैंचा, CPP कल्चर आणि एस ९ कल्चरचे पॅकेट सर्व सभासद शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून देण्यात आले. याचा लाभ उमराठच्या बहुसंख्य शेतकऱ्यांनी घेतला आणि रासायनिक खतांचा वापर न करता यापुढे सेंद्रिय खतांचा वापर करून सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय उमराठच्या शेतकऱ्यांनी केला आहे. Umrath farmers will do organic farming
सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उमराठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुरज घाडे, कारकून नितीन गावणंग, ग्राम रोजगार सेवक प्रशांत कदम आणि डाटा ऑपरेटर साईस दवंडे यांनी मोलाचे सहकार्य केले. Umrath farmers will do organic farming