आमदार जाधव, इथली जनता माझ्यापाठीशी भक्कमपणे उभी
गुहागर, ता. 15 : आज गुहागरमध्ये जी विकास कामे सुरु आहेत ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झाली होती. दुर्दैवाने नंतरच्या सरकारने या कामांच्या फाईल कपाटात बंद करुन ठेवल्या होत्या. न्यायालयात गेल्यानंतर या फाईल बाहेर पडल्या. त्यामुळे श्रेयाची भाषा बोलणाऱ्यांना कितीही बोलु दे जनतेला ही कामे कोणी केली हे चांगलेच माहिती आहे. असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले. Uddhav Thackeray in Guhagar
शृंगारतळीतील जनसंवाद यात्रेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आमदार भास्कर जाधव बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या 15 वर्षात हा मतदारसंघ मी मजबूत बांधला आहे. मंत्री असताना प्रत्येक गावात अधिकाऱ्यांसह जावून गावाच्या विकासाचा आराखडा बनवला. त्यामुळे आता गुहागर मतदारसंघातील बहुतेकश्या भागाचा विकास पूर्ण झाला आहे. त्यामुळेच इथली जनता माझ्यापाठीशी भक्कमपणे उभी आहे. या मतदारसंघाची मला चिंता नाही. पूर्व विदर्भाची जबाबदारी तर आपण दिलीच आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात अन्य कोणीतीही जबाबदारी दिली तर तीला योग्य न्याय देईन. Uddhav Thackeray in Guhagar
मला महाराष्ट्राच्या समोर भाजपच्या इथल्या सभेचे व्हिडिओ दाखवायचे होते. भाजपचे पदाधिकारी, शिर्षस्थ नेते सभेतील शिवराळ भाषा ऐकून फिदीफिटी हसत होतेच पण त्या सभेनंतरही त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून या भाषेचे समर्थन केले हे संपूर्ण महाराष्ट्राला कळले असते. भाजपच्या संस्कृतीचे दर्शन घडवले असते. परंतु आपण संस्कृती सोडायची नाही असे सांगत पक्षप्रमुखांनी परवानगी नाकारली. भाजपने हा घोडा कुठे वापरायचा असेल तीथे वापरावा, आम्हाला काहीही फरक पडत नाही. Uddhav Thackeray in Guhagar
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना गुहागरातील तरुणांना रोजगार देता यावा म्हणून एमआयडीसीची घोषणा केली. मात्र ही एमआयडीसी यांनी रद्द केली. माथाडी कामगार बोर्डाच्या धर्तीवर मच्छीमारांसाठी मी मंत्री असताना स्वतंत्र बोर्ड बनवले ते यांनी बंद केले. त्यामुळे भाजपवाल्यांना विकास करायचा नाही तर असंस्कृत राजकारणच करायच आहे हे सिध्द झाले आहे. Uddhav Thackeray in Guhagar
गुहागरच्या सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले ते या ऐकण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा