अनंत गीते, आमच्या सभेत कोणीही भाडोत्री नाही
गुहागर, ता. 15 : भाजप आणि त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसच्या गद्दारांना सर्व मते विकत घ्यावी लागणार आहेत. या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडेल. पापाच्या, शापाच्या पैशाला आम्ही हात लावणार नाही. अशी शपथ सभेला आलेल्या सर्वांकडून अनंत गीतेंनी घेतली. Uddhav Thackeray in Guhagar


उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जनसंवाद यात्रेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येण्यापूर्वी रायगड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी मनोगत व्यक्त केले. गीते म्हणाले की, व्यक्तीगत टिका करणे, आरोप करणे हा माझा स्वभाव नाही. माझ्या राजकीय जीवनात मी एका उंचीवर आहे तीथून खाली उतरुन मी बोलणार नाही. महायुतीच्या सभेत खुर्च्या भरण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाते. एमआयडीसीतून, भाड्याने पैसे देवून माणसे बोलवावी लागतात. मात्र इथे निष्ठवान माणसे आली आहेत. खोकेवाल्यांना खोके खर्च करुन माणसे आणावी लागतात. आज सत्ताधाऱ्यांकडे देण्यासारखे काहीच नाही. शिवराळ सभा वापरतात. सुसंस्कृत भाजपवाल्यांनी सत्तेसाठी आपली संस्कृती गहाण टाकली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसच्या गद्दारांना सर्व मते विकत घ्यावी लागणार आहेत. याला कोणीही भुलू नका. Uddhav Thackeray in Guhagar


यावेळी गुहागर तालुक्यातील 23 गावात रहाणाऱ्या मुस्लीम समाजाचे प्रमुख बांधव रमजानचा पवित्र महिना असूनही या सभेला उपस्थित राहील्याबद्दल अनंत गीतेंनी त्यांचे आभार मानले. Uddhav Thackeray in Guhagar
गुहागरच्या सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले ते या ऐकण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा