उद्धव ठाकरे, अन्यथा देशात हुकमशाही येईल
गुहागर, ता. 14 : आता वाजपेयी, अडवाणींचा भारतीय जनता पक्ष राहीलेला नाही. वेगवेगळ्या पक्षातून भाडोत्री नेते, कार्यकर्ते येवून तो भाडोत्री, भाडखाऊ जनता पक्ष झालाय. 400 हून अधिक जागा आणून यांना घटना बदलायची आहे. हुकुमशाही आणायची आहे. अशांना येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवा. महाराष्ट्राच्या माती गद्दारीचा एकही कोंब उगवू देवू नका. असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. ते शृंगारतळीत जनसंवाद यात्रेत बोलत होते. Uddhav Thackeray in Guhagar
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची जनसंवाद सभा आज शृंगारतळी येथे झाली. या सभेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, रायगड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते उपस्थित होते. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोकणचे आणि शिवसेनेचे घट्ट नाते आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत तुमचे सर्वांचे आशिर्वाद मिळतील हा विश्र्वास आहे. आज फक्त हक्काच्या लोकांबरोबर संवाद साधायला आलोय. आज महाराष्ट्रात शिवसेनेची लाट आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक ही जागा शिवसेनेसाठी मागून घ्या. द्याल तो उमेदवार जिंकेल असे सांगत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री असताना मी काय केले हे सांगण्याची गरजच नाही. दुर्दैवाने भाडोत्री जनता पक्षाने आपल्या पक्षातील काहीजणांना सरकार पाडण्यासाठी गद्दारी करायला लावली. वास्तविक अपवादात्मक परिस्थितीत मुख्यमंत्री पद घ्यावे लागले. परंतु ज्या पक्षाने या गद्दारांना, त्यांच्या मुलाबाळांना मोठे केले त्यांनीच पक्षनेतृत्त्वाने संधी घेतल्यावर पाठीत खंजीर खुपसला. माझं नावं, माझा पक्ष, माझे वडिल चोरले. आम्ही हिंदुत्वाच्या वेडापायी 25-30 वर्ष यांना खांद्यावर घेऊन फिरलो. मात्र ती चूक झाल्यासारखे वाटते. आज भाजपाचे शिर्षासन झालयं. त्यांचे चिमपाट असभ्य, असंस्कृत भाषा बोलु लागलेत. वाजपेयी, अडवाणींचा भारतीय जनता पक्ष राहीलेला नाही. वेगवेगळ्या पक्षातून भाडोत्री नेते, कार्यकर्ते येवून तो भाडोत्री, भाडखाऊ जनता पक्ष झालाय. Uddhav Thackeray in Guhagar
प्रधानमंत्री मोदींच्या अनेक योजना आहेत. आता त्यांनी आणखी एक योजना काढली आहे भ्रष्टाचारी अभय योजना. भ्रष्टाचार केलेल्यांनी त्यांच्या पक्षात जावे कारवाई थांबते ही मोदींची गॅरंटी आहे. त्यांच्या योजनेची रेकॉर्ड विकसनशील भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार या शब्दांवर 2014 पासुन अडकलेली आहे. हा सगळा त्यांचा घृणास्पद धंदा 400 जागा मिळविण्यासाठी आहे. दोन तृतियांश संख्याबळ झाल्यावर यांना घटना बदलायची आहे. विरोधी पक्षाला देशद्रोह्यांसारखी वागणूक देवून, सभागृहातून निलंबीत करुन अनेक घातक कायदे त्यांनी आत्ताच्या अधिवेशनात मंजूर करुन घेतले. आता वन नेशन वन इलेक्शन योजनेखाली त्यांना हुकुमशाही आणायची आहे. संपूर्ण लोकशाही नासवून टाकायची आहे. माझी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती आहे की, त्यांनी लोकशाहीत श्र्वास असेपर्यंत ती वाचवावी. अन्यथा या देशात हुकमशाही आल्याशिवाय रहाणार नाही. ते करतील तो कायदा, तो नेमतील तो अधिकारी. अशी स्थिती येईल. Uddhav Thackeray in Guhagar
2014, 2019 मध्ये आपणच मोदींना निवडून दिले. त्यांचा प्रचार करायला मी आलो होतो. ही माझी चूक झाली. ती मी सुधारली आहे. आता तुम्ही ही चूक सुधारा. पुन्हा मोदी सरकार आले तर तोंडसुध्दा उघडता येणार नाही. अनंत गीतेंना निवडून द्यायचे आहे. इंडिया आघाडीचे सरकारमध्ये हक्काचा पंतप्रधान आपल्याला बनवायचा आहे. त्यासाठी अनंत गीते आणि विनायक राऊत यांना निवडून द्या. देशासाठी स्वातंत्रसैनिकांनी बलिदान दिले म्हणून आपण स्वातंत्र्य उपभोगु शकतो आहोत. आता हे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आपल्याला मतदान करावे लागणार आहे. Uddhav Thackeray in Guhagar