आरे नागदेवाडीतील अपघातात 41 जखमी
गुहागर, ता. 12 : सोमवारी (ता. 12) सकाळी 9.25 वाजता आरे नागदेवाडी येथे दोन एस.टी. समोरासमोर धडकल्या. या अपघातात 2 चालकांसह 41 प्रवासी जखमी झाले. अपघाताचे वृत्त कळताच आरजीपीपीएलच्या (RGPPL) मेडिकल सेंटरने तातडीने वैद्यकीय सेवा पुरवली. अधिक उपचाराची आवश्यकता असलेल्या 22 जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाला मदत केली. या अपघातात गंभीर जखमी असलेल्या एका महिलेला जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. तातडीची मदत म्हणून अपघातग्रस्तांना एस.टी.ने 500 रुपयांची रोख मदत केली आहे. Two STs collided head-on

Two STs collided head-on
सोमवारी सकाळी आरे नागदेवाडी येथे रानवीच्या दिशेने जाणाऱ्या शृंगारतळी अंजनवेल या एस.टी.ला शृंगारतळीकडे जाणाऱ्या धोपावे चिपळूण या एस.टी.ने धडक दिली. धोपावे चिपळूण एस.टी. संतोष उकार्डे चालवत होते. या गाडीत 32 प्रवासी होते. तर श्रृंगारतळी अंजनवेल एस.टी.वर चालक म्हणून डी. एल. भोसले होते. या गाडीत 12 प्रवासी होते. अपघात घडला त्या ठिकाणी वळण आहे. सकाळी 9.25 च्या दरम्यान पाऊस पडत असताना उकार्डे यांनी उतारावर असलेले वळणावर आपली एस.टी. चुकीच्या बाजुला (Wrong Side) नेली. त्याचवेळी रानवीकडे जाणाऱ्या शृंगारतळी अंजनवेल एस.टी.वर ही उकार्डे यांची बस येवून आदळली. या धडकेमध्ये दोन्ही बसमधील प्रवासी समोरच्या सीटवर आदळले. त्यामुळे सर्व प्रवाशांच्या नाका, तोंडाला जखमा झाल्या. Two STs collided head-on

आरजीपीपीएलचे मदत कार्य
अपघाताचे वृत्त आरजीपीपीएलच्या मेडिकल सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज इंजे यांना दुरध्वनीवरुन कळले. त्यानंतर डॉ. इंजेनी आपली रुग्णवाहिका अपघातस्थळी पाठवली. जखमींची संख्या जास्त असल्याचे लक्षात आल्यावर डॉ. इंजेनी कोकण एलएनजीचे अधिकारी रेड्डी यांना कळवले. रेड्डीनी त्यांची रुग्णवाहिकाही पाठवून दिली. दरम्यान रानवीचे विलास बारगोडे आपली मारुती व्हॅन घेवून अपघातस्थळी पोचले. या सर्वांनी जखमींना आरजीपीपीएल मेडिकल सेंटरमध्ये आणले. दरम्यानच्या काळात डॉ. इंजेंनी रुग्णालयातून निवासी वसाहतीमध्ये गेलेल्या डॉक्टर, सिस्टर यांना बोलावून घेतले. त्यानंतर डॉ. इंजे, डॉ. रिशु रंजन, डॉ. मनोज चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व जखमींवर प्राथमिक उपचार करण्यास सुरवात केली. Two STs collided head-on

गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयातही उपचार
अधिक उपचाराची गरज असलेल्या 22 जखमींना रुग्णवाहीका व एस.टी.ने ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे आणण्यात आले. त्याचवेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, नगरपंचायतीमधील गटनेते उमेश भोसले, श्रद्धा घाडे, शार्दुल भावे, मंदार पालशेतकर, हेमंत बारटक्के ग्रामीण रुग्णालयात पोचले. त्यांनी सर्व रुग्णांसाठी बेड व अन्य व्यवस्था करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मदत केली. Two STs collided head-on
वैद्यकिय अधिकारी डॉ. बळवंत आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने जखमींच्या ओठ, नाक यांना टाका घालण्याचे काम केले. काही रुग्णांच्या जबड्याला दुखापत झालेली असल्याने त्यांना दंतवैद्यांचा सल्ला घेण्यास सांगितले. 22 पैकी 21 रुग्णांना उपचार करुन घरी सोडण्यात आले. तर 45 वर्षीय सुहासिनी सैतवडेकर यांच्या उलट्या थांबत नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले असल्याचे डॉ. बळवंत यांनी सांगितले. Two STs collided head-on

जखमींची नावे
कैलास तुकाराम नायनाक (50, पालशेत), प्रसाद महादेव वायंगणकर (32, दाभोळ), साहील पालकर (18, पालपेणे), सुनंदा गावणकर (80, रानवी), शकुंतला शिगवण (75, रानवी), महमंद बामणे (70, दाभोळ), अश्फाक कुपे (49, शृंगारतळी), अनिल मोहित (45, कोथरुड), विलास साळवी (45, मार्गताम्हाने), प्रगती भेकरे (50, रानवी), पार्वती चोगले (75, रानवी), पद्मजा तांडेल (77, वेलदूर), योगिता वणकर (25, नवानगर), कोमल पवार (18, वेलदूर), नम्रता पवार (45, घरटवाडी), प्रांजली भोरजी (19, धोपावे), प्रज्ञेश पाष्टे (18, खामशेत), आसावरी कदम (41, वेलदूर), संतोष उकार्डे (53, आबलोली), अथर्व यादव (16, पालपेणे), आदेश वाड्ये (38, अंजनवेल), श्रेया बागकर (15, अंजनवेल), सानिका भुवड (17, पवारसाखरी), सानिका शितप (17 पवारसाखरी), चंदना दणदणे (16 पवारसाखरी), समिक्षा पवार (16, पवारसाखरी), सानिका झगडे (16 पवारसाखरी), साहिल भुवड (17, पवारसाखरी), सुहासिनी सैतवडेकर (45, अंजनवेल), सायली डांगे (41, अंजनवेल), सुगंधा कदम (80, वेलदूर), आकांक्षा राठोड (19, आगरवायंगणी), आयुष पवार (20, घरटवाडी), प्रतिक भावे (16, खामशेत), मधुकर पारधी (73 धामणदेवी), शंकुतला सैतवडेकर (65, अंजनवेल), सायली सैतवडेकर (10, अंजनवेल) Two STs collided head-on

एस.टी.ची मदत
अपघाताचे वृत्त कळताच गुहागरचे आगार व्यवस्थापक वैभव कांबळे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोचले. रुग्णांना भेटण्यासाठी आरजीपीपीएलच्या मेडिकल सेंटरलाही वैभव कांबळे यांनी भेट दिली. अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात न्यावयाच्या रुग्णांना एस.टी. उपलब्ध करुन दिली. त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांना तातडीची मदत म्हणून रु. 500 देण्यात आले. या मदतीसोबतच अधिक उपचार किंवा औषधांची गरज असेल तर त्यासाठी स्वतंत्र फॉर्मही सर्व रुग्णांना दिला असल्याचे वैभव कांबळे यांनी सांगितले आहे. Two STs collided head-on
