• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

एटीएम मशीन फोडणाऱ्या दोघांना अटक

by Guhagar News
June 2, 2023
in Ratnagiri
107 1
0
Two people arrested for breaking ATM machine
210
SHARES
599
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 02 : रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथील एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी मध्यरात्री २.४३ वा. घडली आहे. या दोन्ही संशयितांना न्यायालयाने २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. Two people arrested for breaking ATM machine

सुरज अमर मोटे (21, रा.जयसिंगपूर ता. शिरोळ, कोल्हापूर) आणि गिरीराज भजनलाल गुर्जर (21, रा. सवाईमाधोपूर, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयित तरुणांची नावे आहेत. याबाबत बँक ऑफ महाराष्ट्रचे मॅनेजर  यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानूसार, बुधवारी मध्यरात्री दोन्ही संशयितांनी कुवारबाव येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन उचकटून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. परंतू पैसे न मिळाल्याने त्यांनी एटीएम मशीनचा दरवाजा व एटीएम मशीन वरील कॅमेरा फोडून नुकसान करुन पळ काढला होता. Two people arrested for breaking ATM machine

दरम्यान, हा सर्व प्रकार एटीएममधील सीसीटिव्हीमध्ये कैद झाला होता. बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची बाबत बँक मॅनेजरला माहिती मिळताच त्यांनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एटीएममधील सीसीटिव्ही फूटेजच्य सहाय्याने चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना रेल्वेस्टेशन येथून ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांचीही रवानगी 2 दिवसांच्या पोलिस कोठडीत केली. Two people arrested for breaking ATM machine

Tags: ATMGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTwo people arrested for breaking ATM machineUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share84SendTweet53
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.