अल्पवयीन मुलगा व सज्ञान मुलगीचा शोध प्रगतिपथावर
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावातून अल्पवयीन मुलगा व सज्ञान मुलगी शनिवारी रात्रीपासून बेपत्ता आहेत. या दोघांच्या बेपत्ता होण्याचा एकमेकांशी दुरान्वयेही संबध नाही. गुहागर पोलीस ठाण्यात दोघांच्याही पालकांशी तक्रार दाखल केली आहे. शोध कार्य प्रगतिपथावर असून पोलीसांचे पथक दोघांच्या शोधार्थ रवाना झाले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी दिली. Two missing from the Guhagar

गुहागर तालुक्यातील पालपेणे येथील एक अल्पवयीन मुलगा शनिवारी सकाळी रामपूर येथील मिलिंद विद्यालयात जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. मात्र हा विद्यार्थी सायंकाळपर्यंत घरी परत आला नाही. म्हणून शोधाशोध सुरु झाली. मित्रांकडे चौकशी केली असता सदर विद्यार्थी शनिवारी शाळेतही आले नसल्याचे समोर आले. त्यामुळे हवालदिल झालेल्या पालकांनी रात्री गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दरम्यानच्या काळात सामाजिक माध्यमांवरुनही सदर विद्यार्थी बेपत्ता असल्याची माहिती सर्वदूर पोचविण्यात आली होती. या माहितीच्या आधारे एका शहरात सदरचा मुलगा असल्याचे कळले. तातडीने ही माहिती पोलीसांपर्यंत पोचविण्यात आली. रविवार सकाळपासून पोलीसांच्या शोध मोहिमेला वेग आला. तातडीने एक पथक संबंधित शहराकडे रवाना झाला आहे. Two missing from the Guhagar
शनिवारी आणखी एक मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात झाली आहे. सदर मुलगी सज्ञान आहे. ही मुलगी एकटीच बेपत्ता झाल्याने पालकही चिंतेत आहेत. पोलीसांकडे तक्रार झाल्यानंतर या मुलीचा शोध पोलीसांनी सुरु केला आहे.

ही दोन्ही मुले एकाच दिवशी बेपत्ता झाली असली, तरी त्यांचा परस्पर काहीही संबंध नाही. या दोन स्वतंत्र घटना आहेत. तपास वेगाने सुरु आहे. दोन्ही घटनांबाबत तपासाची दिशा नक्की झाली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी दिली आहे. Two missing from the Guhagar