रवींद्र वणकुद्रे, गुहागर आगाराचे भारमान वाढले
गुहागर, ता. 12 : गुहागर आगारातील एस.टी.मधुन मार्च महिन्यात 1 लाख महिलांनी प्रवास केला तर एप्रिल महिन्यात ही संख्या 2.5 लाखाहून अधिक होती. तर शिमगोत्सवाच्या काळात 7 लाख प्रवाशांनी एस.टी.ला पसंती दिली. कोरोना महामारी आणि कामगारांच्या संपानंतर गुहागर आगार पुन्हा ग्राहकांना एस.टी.कडे वळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशी माहिती गुहागरचे प्रभारी आगारप्रमुख रवींद्र वणकुद्रे यांनी पत्रकारांना दिली. Two lakh women traveled by ST
गुहागर आगारात आज प्रवाशांसाठी मोफत स्वच्छ व थंड पेयजल सुविधेचे उद्घाटन दोन जेष्ठ प्रवाशांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेसाठी नासिम मालाणी यांनी संपूर्ण सहकार्य केले. उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना वणकुद्रे म्हणाले की, गुहागर आगारात 68 एस.टी. बस आणि 2 मिडी बस आहेत. सर्व एस.टी.बस उत्तम स्थितीत असून रस्त्यावर धावत आहेत. गुहागर आगारातील एस.टी.च्या फेऱ्या प्रतिदिन 24 हजार कि.मी. पूर्ण करतात. सध्या काही शालेय फेऱ्या सोडल्यास सर्व मार्गावर वहातूक सुरळीत सुरु आहे. 15 ऑगस्ट 2022 ला 75 वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना सुरु झाली. तर 18 मार्च 2023 ला महिला सन्मान योजना सुरु झाली. या दोन योजनांमुळे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिमगोत्सवाच्या काळात मार्च महिन्यात एकूण 7 लाख 37 हजार 950 प्रवाशांनी एसटीने प्रवास केला. त्यामध्ये महिलांची संख्या 1 लाख, 8 हजार 236 होती. एप्रिल महिन्यात 6 लाख 64 हजार 252 भारमान होते. परिक्षेचा हंगाम असल्याने एकूण प्रवाशी संख्येत 73 हजार ने घट झाली होती. तरीदेखील महिला प्रवाशांची संख्या 2 लाख 56 हजार 525 इतकी होती. याचा अर्थ योजना जाहीर झाल्यानंतरच्या महिन्यात महिला प्रवाशांच्या संख्येत दिड लाखाने वाढ झाली आहे. Two lakh women traveled by ST
मे महिन्यात या संख्येत आणखी वाढ होईल. त्यामुळे प्रदिर्घ कालावधीनंतर ग्रामीण भागातील जनता एस.टी.ने प्रवास करु लागली आहे. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सद्यस्थितीत असलेल्या सर्व गाड्या चालू असल्या तरी आम्हाला अजुनही 10 ते 15 गाड्यांची आवश्यकता आहे. आज 408 चालक वाहक कार्यरत असून 137 चालक वाहकांची कमी आहे. अशा स्थितीतही प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न गुहागर आगारातील कर्मचारी करत आहेत. Two lakh women traveled by ST