मुंबई, ता. 04 : कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या दोन रेल्वेगाड्यांचे प्रत्येकी दोन डबे वाढले आहेत. संरचनेत बदल करण्यात आला आहे. हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन त्रि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेस आणि हजरत निजामुद्दीन – मडगाव – हजरत निजामुद्दीन द्वि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला प्रथम श्रेणीचा वातानुकूलित डबा आणि तृतीय श्रेणीचा वातानुकूलित डबा असे दोन डबे कायमस्वरूपी जोडण्यात येणार आहेत. Two coaches of Konkan Railway increased
माहितीनुसार, गाडी क्रमांक 12432 हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल त्रि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला 4 फेब्रुवारीपासून तर, गाडी क्रमांक 12431 तिरुवनंतपुरम सेंट्रल- हजरत निजामुद्दीन त्रि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला 6 फेब्रुवारीपासून डबे जोडण्यात येतील. गाडी क्रमांक 22414 हजरत निजामुद्दीन मडगाव द्वि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला 7 फेब्रुवारीपासून तर, गाडी क्रमांक 22413 मडगाव- हजरत निजामुद्दीन द्वि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला 9 फेब्रुवारीपासून अतिरिक्त डबे जोडले जातील. डब्यांच्या सुधारित रचनेप्रमाणे प्रथम श्रेणी वातानुकूलित 2 डबे, द्वितीय श्रेणी वातानुकूलित 5 डबे, तृतीय वातानुकूलित 12 डबे, पन्ट्री कार 1 आणि जनरेटर कार 2 अशी असणार आहे. Two coaches of Konkan Railway increased