• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 March 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी येथे साकारणार बारा ज्योतिर्लिंग दर्शन

by Manoj Bavdhankar
February 11, 2023
in Guhagar
188 2
0
Twelve Jyotirlinga Darshan at Sringaratali
369
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रजापिता ब्रह्माकुमारीचा उपक्रम; दि. 14 ते 19 फेब्रुवारी पाटपन्हाळे हायस्कूल मैदान

गुहागर, ता, 11 : शृंगारतळी येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शृंगारतळी तर्फे महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंग दर्शन साकारण्यात येणार आहेत. शृंगारतळी येथील पाटपन्हाळे हायस्कूल मैदानात ही ज्योतिर्लिंग साकारली जाणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन दि. 14 ते 19 फेब्रुवारी 2023 या कालावधीत करण्यात आलेले आहे. Twelve Jyotirlinga Darshan at Sringaratali

यावेळी महाशिवरात्री निमित्ताने विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वैल्यू गेम्स, अध्यात्मिक चित्र प्रदर्शन, यशस्वी व्यापारासाठी पाऊल, व्यसनमुक्ती,  राजयोग अनुभूती, अध्यात्मक साहित्य याचेही प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. विशेष आकर्षण म्हणजे 12 ज्योतिर्लिंग दर्शन असून यात 11 फुटी शिवलिंग, धबधबा,  या गुहेमध्ये सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, मल्लिकार्जुन, ओंकारेश्वर, घृणेश्वर, केदारनाथ, महाकालेश्वर, भीमेश्वर, रामेश्वर, नागेश्वर, विश्वेश्वर व वैद्यनाथ या बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन साकारण्यात येणार आहे. व गुहागर तालुका वासियांना याचे दर्शन मिळणार आहे. Twelve Jyotirlinga Darshan at Sringaratali

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे तहसीलदार प्रतिभा वराळे व ब्रह्माकुमारीच्या राजयोगिनी सुनंदा दीदी (क्षेत्रीय संचालिका पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दिनांक 15 ते 17 फेब्रुवारी योगा व तणाव मुक्ती शिबिर आयोजन करण्यात आले असून ते सकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत आहे. तालुका वासियांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान शिल्पा बहेनजी  यांनी केले आहे. Twelve Jyotirlinga Darshan at Sringaratali

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयातर्फे निराकार शिव परमात्म्याने आपले साकार माध्यम प्रजापिता ब्रह्माद्वारे 1937 मध्ये या विश्वविद्यालयाची स्थापना केली. विश्वामध्ये बंदुत्व आणि शांती स्थापनेचा उद्देश. नैतिक व आध्यात्मिक मूल्यांची शिक्षा. विश्वामध्ये 140 पेक्षा अधिक देशांमध्ये दहा हजार पेक्षा अधिक शाखा संयुक्त राष्ट्र संघाशी संलग्न आहेत. Twelve Jyotirlinga Darshan at Sringaratali

Twelve Jyotirlinga Darshan at Sringaratali
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTwelve Jyotirlinga Darshan at SringarataliUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share148SendTweet92
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.