• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर बाग किनाऱ्यावरुन 140 अंडी संवर्धीत

by Mayuresh Patnakar
December 20, 2023
in Guhagar
252 2
81
Turtle conservation in Guhagar

Turtle conservation in Guhagar

495
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ढगाळ वातावरण आणि अवकाळी मुळे हंगामाला उशीर

गुहागर, ता. 20 : येथील बाग समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवाची 140 अंडी सापडली. वनपाल संतोष परशेट्ये यांच्या उपस्थितीत ही सर्व अंडी उबवण कक्षात संवर्धीत करण्यात आली आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे यावर्षीही गुहागरच्या समुद्रावर अंडी मिळण्याचा हंगाम महिनाभर लांबला आहे. गेल्यावर्षी गुहागरच्या केंद्रात  200 हून अधिक मादी ऑलिव्ह रिडले कासवांची 23 हजारपेक्षा जास्त अंडी संवर्धित केली होती. या वर्षी देखील मोठ्या संख्येने ऑलिव्ह रिडले कासवांची हजारो अंडी संवर्धीत करता यावीत अशी तयारी वन विभाग आणि कांदळवन कक्षातर्फे केली जात आहे.  Turtle conservation in Guhagar

गेल्या 10 वर्षात सातत्याने गुहागर समुद्रावर अंडी देण्यासाठी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील कासव संवर्धन निसर्ग पर्यटनाचाही एक भाग बनत आहे. यावर्षी दिवाळीनंतर वन विभाग आणि कांदळवन कक्षाने गुहागरमधील कासव संवर्धन केंद्राला अधिक बळकटी देण्याचे काम सुरु केले. कोरोनापूर्वी 7.5 किलोमिटरच्या समुद्रकिनाऱ्यावर कासव संवर्धानासाठी केवळ 2 कासवमीत्रांची नियुक्ती करण्यात आली होती. यावर्षी 6 कासवमित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये संजय भोसले, शार्दुल तोडणकर, रविंद्र बागकर, कुसुमाकर बागकर, विक्रांत सांगळे, दिलीप सांगळे या कासवमित्रांचा समावेश आहे. त्यांना अंडी संवर्धन प्रक्रिया व पर्यटकांशी संवाद साधताना घ्यायची काळजी याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच मोठ्या संख्येने अंडी संवर्धीत करण्यासाठी योग्य जागेची निवड करुन तेथे अंडी उबवण केंद्र बांधण्यात आले. आता वन विभाग, कांदळवन कक्ष, कासवमित्र आणि गुहागरमधील निसर्गस्नेही यांना ऑलिव्ह रिडले कासवांची प्रतिक्षा आहे.  Turtle conservation in Guhagar

दरवर्षी ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मादी कासवे अंडी घालण्यासाठी येतात. मात्र बदललेल्या हवामानामुळे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात पहिले घरटे सापडले. यावर्षी देखील बदललेल्या हवामानामुळे हंगाम लांबत चालला आहे. 16 डिसेंबरला पहिले घरटे सापडल्यावर पुढे दररोज घरटी सापडतील असा अंदाज होता. मात्र गेल्या तीन दिवसांत एकही घरटे सापडले नाही. उलट 20 डिसेंबरला सकाळी पावसाचा हलका शिडकाव झाल्याने दुसरे घरटे मिळण्यास आणखी विलंब होऊ शकतो.  Turtle conservation in Guhagar

गेल्यावर्षी 23 हजाराहून अधिक अंडी संवर्धीत करण्यात आली.  मात्र त्यापैकी सुमारे 7200 कासवांची पिल्लेच समुद्रात सोडण्यात आली.  हा प्रजनन दर अवघा 31.30 टक्के आहे. यावर्षी अंड्यांच्या संवर्धनाप्रमाणेच संवर्धीत केलेल्या अंड्यांमधुन पिल्ले बाहेर पडण्याची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान वन विभाग, कांदळवन कक्ष, कासवमित्र आणि निसर्गस्नेहीं समोर आहे. Turtle conservation in Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTurtle conservation in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share198SendTweet124
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.