• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोली येथे SK-4 गृप तर्फे हळद लागवड प्रशिक्षण

by Ganesh Dhanawade
March 10, 2025
in Guhagar
132 1
0
Turmeric cultivation training at Aabloli
259
SHARES
741
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 10 : आम्ही  20-25 वर्षात हळद लागवडीखाली जे अनुभव व ज्ञान मिळवले आहे, त्या ज्ञानाचा उपयोग करून इतर शेतकऱ्यांनी हळद लागवडीत प्रगती करावी, आम्ही  मोकळेपणाने संपूर्ण  मार्गदर्शन सातत्याने आपणास करत राहू, असे आवाहन नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त SK-4 हळदीच्या वाणाचे प्रणेते सचिन कारेकर  यांनी केले. दरवर्षी प्रमाणे एस.के.-4 गृप तर्फे  आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्रात हळद लागवड ते प्रकिया या बाबतचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. Turmeric cultivation training at Aabloli

Turmeric cultivation training at Aabloli

ते पुढे म्हणाले की, आम्ही  आयुष्यातील  25 वर्ष  खर्ची करून SK-4 ही हळदीची जात तसेच कोकणातील  परिस्थितीत  हळद लागवडीचा तंत्रज्ञान विकसित केले आहे. आज हे ‘रेडिमेड’ तंत्रज्ञान आपणासमोर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मांडतोय. या ज्ञानाचा उपयोग अवश्य करावा व आपली प्रगती करावी, असेही  सचिन कारेकर यांनी सांगितले. हळद लागवडीला पावसाळ्यानंतर जानेवारी महिन्यापर्यंत पाणी देणे आवश्यक असल्याचे सांगून  जर हे शक्य झाले तरच चांगल्याप्रकारे उत्पादन आपण काढू शकतो. नाहीतर  उत्पादनावर परिणाम होतो, असे प्रतिपादन  पंचायत समितीचे माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी आपल्या  मार्गदर्शनातून केले. पाण्यात विरघळणा-या रासायनिक  खताचा तसेच जिवामृतच्या वापराने हळदीचा गड्डा पोसण्यास मदत होते,असेही ते म्हणाले. Turmeric cultivation training at Aabloli

या प्रशिक्षणात हळद लागवडीसाठी बियाणे निवड, बियाणे साठवणूक,  हळद लागवड,  सेंद्रिय  व रासायनिक खतांचा वापर, किड- रोग नियंत्रण, हळद लागवडीला पावसानंतर चे पाणी व्यवस्थापन, हळद काढणी, कापणीनंतर प्रक्रिया या विषयावर  सविस्तर  मार्गदर्शन    सचिन कारेकर यांनी केले.  यावेळी हळद लागवड, हळद उजळणी, हळद पॉलीश करणे याबाबत प्रत्यक्ष  प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. पंचायत समितीचे माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी ओल्या हळकुंडापासून रोपे तयार करण्याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे, पालघर या जिल्ह्य़ातील शेतकरी प्रशिक्षणाला उपस्थित होते. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थींनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. Turmeric cultivation training at Aabloli

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarTurmeric cultivation training at AabloliUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share104SendTweet65
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.