• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पर्यटन व्यावसायिकांना फसविण्याचा प्रयत्न असफल

by Ganesh Dhanawade
September 28, 2024
in Guhagar
250 2
2
491
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागरातील प्रकार, वाढीव रक्कम भरल्याचे सांगून परतावा मागितला

गुहागर, ता. 28 : ऑनलाईन फसवणूकीचे नवीन नवीन युक्ती आखली जात असून गेले महिनाभर एक व्यक्ती वेगवेगळया मोबाईल नंबरवरून हॉटेल, लॉज व होमस्टे मध्ये रूम बुकींगचा फोन करत आहे. रूम बुकींगकरीता पाठवावी लागणाऱ्या रक्कमेपेक्षा १० फट जादा रक्कम आपण टाकली असल्याचे सांगत रक्कम परत मागून फसविण्याचा अनोखा स्कॅम एक भामटा करत असल्याचे समोर आले आहे. सदर व्यक्ती हा आपण आर्मी मॅन असल्याचेही सांगत आहे. Trying to cheat tourism professionals

सुरूवातीला संबधीत हॉटेल, लॉज व होमस्टे धारकांच्या व्हॉटसअॅप नंबरवर काही तारखांना रूम मिळेल का असा मॅसेच टाकत आहे. त्यानंतर मोबाईलवर फोन करून रूमची माहीती घेऊन बुकींग रक्कम कितीही असुदे तातडीने टाकतो असे सांगून बुकींग नक्की करतो. काही वेळाने तो जी बुकींग रक्कम असते त्या रक्कमेवर एक शुन्य वाढवून तब्बल दहापट रक्कम आपण फोन पे केल्याचा स्क्रीन शॉट पाठवतो. सदर पाठवीलेल्या स्क्रीनशॉटवर युपीआय आयडी, टायमींग, संबधीत हॉटेल, होमस्टे यांचे नाव सर्व काही खर परंतु बोगस इमेज पाठवतो व लगेचच चुकून आपली जादा रक्कम गेली असून बुकींग रक्कम ठेवून उर्वरीत रक्कम तातडीने मला माझ्या मोबाईल नंबरवर पाठवा, अशी मागणी करतो यामध्ये बुकींगरीता २ हजार किंवा ६ हजार रूपया ऐवजी २० हजार किंवा ६० हजारापर्यंतची रक्कम पाठवून जादा गेलेली रक्कमेची मागणी करत आहे. Trying to cheat tourism professionals

मात्र सदर रक्कम आपल्याकडे जमा झालेली दिसून येत नाही असे सांगितल्यावर बँकेतुन आपल्या खात्यामधील रक्कम कट झालेला बोगस मोबाईल मॅसेजही तो पाठवत आहे. या जोडीला आपण आर्मी मॅन असून चुकून जादा रक्कम आपल्याकडे गेली असून मला उर्वरीत पैशाची तातडीने गरज असल्याचे ही तो सांगत आहे. परिणामी सदर हॉटेल, लॉज किंवा होमस्टे मालक तातडीने पैसे परत पाठवतो आणि यातूनच रूम बुकींग स्कॅमचा प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. Trying to cheat tourism professionals

दरम्यान, यातील बहुतांशी हॉटेल व लॉज, होमस्टे मालकांना या बोगस व्यक्तीची सुरू असलेली ही फसवणूक लक्षात आल्याने सावधानता बाळगली आहे. एवढेच नव्हे तर काहींनी पैसे पाठविण्याही तयारी केली असताना दुसऱ्या सहकाऱ्याने ही फसवणुक असल्याचे लक्षात आणून दिल्यावर याला बळी पडण्यापासून वाचले आहेत. काही बोगस व्यक्ती रात्री आपण प्रवासात असून या प्रवासामध्येच जादा रक्कम पाठवून आता आमच्याकडे पेट्रोल भरण्यासाठी पैसे नसून जादा गेलेली रक्कम तातडीने माझ्या मोबाईल पाठवा, असेही सांगत आहेत. अशामध्ये बँकांही गुगलपे, फोन पे या मार्गाने येणारी रक्कम सेटलमेंट करण्यासाठी तीन तासापेक्षा जास्त किंवा दुसऱ्या दिवसाचा कालावधी घेतला असल्याचे होणाऱ्या फसवणुकीपासून दिलासा मिळत आहे. मात्र या बोगस रूम बुकींग स्कॅमपासून सावधान व सतर्क रहा, असे आवाहन प्रशासन करत आहे. Trying to cheat tourism professionals

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarTrying to cheat tourism professionalsUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share196SendTweet123
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.