संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता.02 : तालुक्यातील आबलोली येथील बाजारपेठेपासून जवळच असलेल्या अवघड वळणावर बॉक्साईड वाहतूक करणारा मोठा ट्रक सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कलंडला. Truck Accident at Aabloli


काताळे येथून बॉक्साईड (दगड) वाहतूक करणारा भलामोठा ट्रक ( एलपी ट्रक) आबलोली मार्गे कर्नाटकला जात होता. रस्त्याचा अदांज न आल्याने आबलोली येथे सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अवघड वळणावर रत्याच्या साईटच्या गटारात गेला. रात्रीच्या वेळी काताळे या आबलोली मार्गावरुन ब-याच मोठ्या प्रमाणात ट्रकव्दारे वाहतूक होत असते. या अवजड वाहनांमुळे आबलोली रस्त्याचीही पूर्णतः दुर्दशः झाली आहे. जवळच्या नागरीकांना कर्कश आवाजांचाही सामना करावा लागत आहे. पावसाचे दिवस असल्याने शालेय विद्यार्थांसह पादचा-यांची रंगपंचमी होत आहे. Truck Accident at Aabloli

