गुहागर, ता. 07 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर शाळेची सहल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, कुणकेश्वर देवगड, आडिवरे महाकाली मंदिर, कशेळी येथील सूर्य मंदिर, श्री स्वामी स्वरूपानंद मंदिर, मत्स्यालय, थिबा राजवाडा, तारांगण, मांडवी बंदर, भगवती मंदिर, भगवती बंदर, सिमेंट कारखाना, भाटे बीच या ऐतिहासिक, सांस्कृतिक, प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. Trip by students of Veldur School
विद्यार्थ्यांनी रत्नदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यावर जाऊन, किल्ल्याची सर्व बाजूंनी माहिती घेत पोवाडे व गीत गायन केले. मत्स्यालयामध्ये 57 फुटी देवमासाचे अवशेष, जैविक विविधता, अनेक वर्षापूर्वीची कासव, विविध माशांच्या प्रजाती यांची माहिती घेतली. विजयदुर्ग रत्नदुर्ग व शिवसृष्टी मध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत स्फूर्तीदायक इतिहास जाणून घेतला. किल्ल्यावर असणारे विविध बुरुज, नगारखाना, भक्कम तटबंदी टेहळणी बुरुज, बालेकिल्ला, तोफखाना, भुयारी मार्ग, प्राचीन विहिरी यांची माहिती घेतली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक भूभागांची, सागर किनाऱ्यांची माहिती घेतली. स्थानिक परिस्थितीनुसार काढली जाणारी पिके, उपलब्ध बाजारपेठ, सजीवांचे अनुकूलन, जिल्ह्यातील पक्षी जीवन, प्राणी जीवन, व्यवसाय यांची माहिती घेतली. सहलीच्या माध्यमातून त्यांना नैतिकतेचे धडे मिळाले व स्वावलंबन शिकायला मिळाले. विद्यार्थ्यांनी परिसर अभ्यासासह प्राचीन भारतीय संस्कृतीचा ठेवा अनुभवला. चौकस बुद्धीने व जिज्ञासा वृत्तीने प्रेक्षणीय स्थळांच्या इतिहासाची माहिती घेतली. विविध व्यवसायासाठी अनुकूल कच्चा माल व हवामान यांची माहिती घेतली. Trip by students of Veldur School


विजयदुर्ग किल्ला म्हणजे स्वराज्याच्या जलदुर्गांची राजधानी होती. शिवाजी महाराजांनी अत्यंत दूरदृष्टीपणाने अत्यंत कमी वयामध्ये आरमार उभारले. परकीय सत्तेंवर अंकुश ठेवले. स्वराज्यावर चालून येणाऱ्या शत्रूंचा धोका ओळखून विविध किल्ल्यांची उभारणी केली. जिजामाता उद्यानामध्ये विद्यार्थ्यांनी मौज मजा केली. विविध आधुनिक पाळणे, ट्रेन, घसरगुंडी, झोपाळे यांचा मनसोक्त आनंद लुटला. दोन दिवस विद्यार्थ्यांनी सहलीच्या माध्यमातून निसर्गाच्या सहवासातून व ऐतिहासिक वास्तूंच्या साक्षीने ज्ञानसंपादन केले. सहलीच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मनोज पाटील, अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला यांनी प्रयत्न केले. Trip by students of Veldur School