गुहागर, ता. 28 : जम्मू काश्मीर मधील पेहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर जिहादी आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून पर्यटकांची निघृण हत्या केली. यामध्ये अनेक पर्यटकांना त्यांनी जखमी केले. सदर घटना ही अतिशय निंदनीय असून या घटनेचा संपूर्ण देशामध्ये तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी शृंगारतळी येथील मनसे मध्यवर्ती कार्यालय समोर पेहलगाम येथील मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. Tribute to the deceased tourists by MNS


दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून बाहेर येण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी बोलताना गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले की, या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व गुहागर तालुक्याच्या वतीने आम्ही जाहीर शब्दात निषेध करत आहोत. काश्मीरमध्ये येणारे पर्यटक आणि हिंदू बांधव यांना पूर्णतः सुरक्षितेची जाणीव व्हावी अशी कडकं कारवाई सरकारने करावी. यावेळी दहशतवाद्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. Tribute to the deceased tourists by MNS
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदिप मांडवकर, पाटपन्हाळे ग्रामपंचायत उप सरपंच असीम साल्हे, शेतकरी संघटना अध्यक्ष प्रसाद कुष्टे, उपतालुका अध्यक्ष अमित खांडेकर, जितेंद्र साळवी, प्रसाद विखारे, राहुल जाधव, रमेश जोशी, विश्वजीत पोदार, सुमित पवार, सतोश खाबे, निलेश गमरे, सुयोग कुंबर्डे, विजय शिंदे, विवेक जानवळकर तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. Tribute to the deceased tourists by MNS