महसुल विभागाची ७ जणांना नोटीस
गुहागर, ता. 13 : शहरातील पोलीस परेड मैदानावर शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या सात व्यावसायिकांना महसुल विभागाने अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे. २४ फेब्रुवारीची अखेरची मुदत दिली असुन अन्यथा पोलिस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढण्याचा इशारा दिला आहे. Trespass on Guhagar Police Parade ground
![Trespass on Guhagar Police Parade ground](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/02/gn1311-1024x550.jpg)
![Trespass on Guhagar Police Parade ground](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/02/gn1311-1024x550.jpg)
गुहागर शहरातील पर्यटनवाढीला समुद्रचौपाटीच्या आजुबाजुला असलेल्या छोटया व्यवसायिकांचे हे सहकार्य होत आहे. मात्र या व्यावसायिकांना कायमस्वरूपी जागा देण्याचे काम कोणालाच करता आलेले नाही. समुद्रचौपाटीवर विनापरवाना उभारलेले गाळे बंदर विभागाने जमिनदोस्त केले होते. त्यानंतर या व्यवसायीकांनी पोलिस परेड मैदानावर आपला मोर्चा वळविला. येथील पर्यटकांना सेवा देण्यासाठी फिरत्या गाडयांचा आधार घेतला. मात्र त्यानंतर थेट पेंडॉल उभे राहीले. यामुळे महसुल विभागाने याअगोदर ४ जानेवारी २०२४ रोजी सदर दुकाने काढण्याचे आदेश दिले होते. सदर कारवाई थांबविण्यासाठी येथील सर्व व्यवसायिकांना १० जानेवारी २०२४ व १८ जानेवारी २०२४ रोजी महसुल विभागाकडे पत्रव्यवहार करून सदर दुकाने हटविण्यासाठी काही महिन्याचा कालावधी मागितला होता. Trespass on Guhagar Police Parade ground
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/02/adv-2.png)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/02/adv-2.png)
दरम्यान, गुहागर तहसिलदार यांनी येथील सात व्यावसायिकांना अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये गतवर्ष मागितलेल्या मुदतीची आठवण करून देत तब्बल १ वर्ष झाले तरीही अतिक्रमण हटविले नाहीत. यामुळे नोटीस मिळताच २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत आपण शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण तातडीने काढून टाकून जमीन पुर्ववत करावी. असे म्हटले आहे. सदर अतिक्रमण काढून न टाकल्यास महाराष्ट्र शासकीय जमिन महसूल संहिता १९६६ मधील कलम ५३ (१) ते (३) नुसार तुमचेविरूद्ध कारवाई करण्यात येईल. तसेच २८ फेब्रुवारी २०२५ रोजी शासकीय जमिनीवरील केलेले अतिक्रमण पाडण्यासाठी येणारा संपूर्ण सरकारी खर्च तुमचेकडून वसुल करण्यात येईल असा आदेश दिला आहे. अतिक्रमण हटविण्याची दिलेल्या नोटीसीमध्ये राजेश कमलाकर साखरकर, सदाशिव नारायण पालशेतकर, उमेश अनंत भोसले, रमेश महादेव सावर्डेकर, गणेश चंद्रकांत भोसले, रविंद्र वसंत रहाटे, इस्माईल माहिमकर यांचा समावेश आहे. Trespass on Guhagar Police Parade ground