गुहागर, ता. 06 : तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांच्या पुढाकाराने व सुप्रसिद्ध अभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाने तवसाळ येथे समुद्रकिनारी ताडबियांची लागवड करण्यात आली. संपुर्ण देशभरात ताड झाडांची लागवड, त्याचे संवर्धन, संगोपन यासाठी वाहुन घेतलेले मुळ तामिळनाडू राज्यातील आणि सध्या मुंबई येथे वास्तव्यास असणारे गोल्डसन सॅम्युअल यांच्या सक्रिय मार्गदर्शन आणि सहभागातुन गुहागर तालुक्यामध्ये ताड बियांचे वाटप करण्यात आले. Tree Plantion at Tavasal
ताडबियांच्या बरोबरीने तहसीलदार वराळे यांच्या माध्यमातुन विविध बहुउपयोगी झाडांचे वाटप आणि लागवड करण्यात आली होती. गुहागर तालुका हा भौगोलिक दृष्ट्या माड आणि सुपारीच्या लागवडीसाठी उपयुक्त असल्याने प्रसिद्ध अभिनेते सयाजीराव शिंदे यांनी तहसीलदार आणि गोल्डसन सॅम्युअल यांच्या माध्यमातुन ताड झाडांच्या लागवडी करता गुहागर तालुका किनारपट्टीची निवड केली आहे. हे झाड पर्यटकांना आकर्षित करणारे असुन जमिनीची धूप थांबविण्यासाठीसुद्धा उपयुक्त आहे. त्याचबरोबर नारळाच्या झाडाप्रमाणे शेतक-याना आर्थिक सक्षम करणारे असल्याने या झाडाची लागवड अधिकाधिक होणे गरजेचे असल्याचे मत तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी व्यक्त केले. याच भावनेतुन प्रेरित होऊन गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या पुढाकाराने कातळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात तवसाळ खुर्द ग्रामस्थांच्या वतीने 50 ताडबियांचे रोपण करण्यात आले. Tree Plantion at Tavasal
यावेळी सरपंच सौ नम्रता निवाते, उपसरपंच प्रसाद सुर्वे, ग्राम विस्तार अधिकारी महेंद्र निमकर, राजेश सुर्वे, अमोल सुर्वे, किरण गडदे, मनोज कांबळे, दिपक बारस्कर, कैलास मोहिते आदी उपस्थित होते. Tree Plantion at Tavasal