गुहागर, ता. 21 : सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या शिवतेज फाउंडेशन, नाटक कंपनी चिपळूण व जानवले ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जानवले जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमात प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते ओंकार भोजने यांनी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. Tree plantation in the presence of Omkar Bhojane
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या परिसरात विविध वृक्षांचे रोप लावून झाली. त्यानंतर आयोजित स्वागत समारंभात शिवतेज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अँड. संकेत साळवी यांनी प्रास्ताविक करत फाउंडेशनच्या सामाजिक कार्यांचा आढावा घेतला. गोपाळगडाच्या खाजगीकरणाविरोधातील लढा यशस्वी झाल्याचा उल्लेख करत गुहागर व परिसरात चालू असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. Tree plantation in the presence of Omkar Bhojane


गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत ओंकार भोजने यांचा अभिनय आणि सामाजिक जाणीव यांचे कौतुक केले. “फक्त कलाक्षेत्रात नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आजच्या पिढीला चांगला संदेश दिला आहे,” असे भिलारे म्हणाले. Tree plantation in the presence of Omkar Bhojane


अभिनेते ओंकार भोजने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. “वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा हा संदेश प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचवावा,” असे आवाहन त्यांनी केले. “शिवतेज फाउंडेशन आणि नाटक कंपनी चिपळूण यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे आज दोन तालुक्यांमधील सामाजिक सलोखा दृढ झाला आहे,” असे ते म्हणाले. Tree plantation in the presence of Omkar Bhojane
या कार्यक्रमाला जानवले सरपंच जान्हवी विखारे, चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, मुख्याध्यापक कैलास शार्दुल, उपसरपंच वैभवी जानवलकर, तालुका कृषी अधिकारी धायगुडे, ग्रामसेवक जी. बी. सोनवणे, शिवतेज फाउंडेशनचे खजिनदार गणेश धनावडे, राजेंद्र आरेकर, विकास मालप, मनसेचे उपजिल्हा प्रमुख विनोद जानवलकर, सामाजिक कार्यकर्ते अजय खाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन कोंडविलकर, ग्रामपंचायत सदस्य मुबीन ठाकूर, मंगेश कोंडविलकर, विभावरी लांजेकर, गजेंद्र पौनीकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कोंडविलकर, राजेंद्र आरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. Tree plantation in the presence of Omkar Bhojane


या कार्यक्रमाचे संयोजन शिवतेज फाउंडेशन व नाटक कंपनी चिपळूण यांनी प्रभावीपणे पार पाडले. शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकवृंदांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. परिसर हरित व सुंदर ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता आहे, हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गोयथळे यांनी केले. Tree plantation in the presence of Omkar Bhojane