• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमध्ये धुवाधार पावसामुळे मोठे नुकसान

by Ganesh Dhanawade
May 27, 2025
in Guhagar
621 6
11
Rain causes major damage in Guhagar
1.2k
SHARES
3.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27  : संपूर्ण गुहागर तालुक्यात सुरु असलेल्या धुवाधार पावसाने घरे, बांध आणि उत्पन्न देणारी झाडे कोसळून मोठी नुकसानी झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. Rain causes major damage in Guhagar

Underground power line works make roads dangerous

गेले आठडाभर सुरु असलेल्या पावसाने आबलोली व भातगाव येथे रस्त्यावर कोसळलेल्या दरडी जेसीबीच्या साहय्याने बाजूला करण्यात आल्या आहेत. याकामी स्थानिकांनी प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल तहसीलदात परीक्षित पाटील यांनी कौतुक केले आहे. मौजे अडूर येथील अशोक नाना देवळे यांच्या अंगणातील आंब्याचे जुने झाड कोसळले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  वेलदूर नवानगर येथील यशवंत जांभारकर यांच्या शौचालयावर दगड व माती आल्याने  शौचालयाचे नुकसान झाले आहे. Rain causes major damage in Guhagar

धोपावे येथे मेनलाईनवर झाड पडल्याने धोपावे आणि त्रिशूलसाखरी गावाचा वीज पुरवठा बंद झाला होता. परंतु, काही वेळाने झाड बाजूला केल्यानंतर पुरवठा सुरळीत करण्यात आला. कोतळूक किरवलेवाडी येथील गंगाय पांडुरंग भेकरे  यांच्या घराची पडवी व छप्पर कोसळले आहे. पालशेत – हेदवी रस्त्यावर पालशेत पाटा वरचीवाडी येथे जंगली झाडांची फांदी पडून रस्ता बंद झाला होता. त्यामुळे काहीकाळ वाहतूक टप्पा झाली होती. असगोली खारवीवाडी येथील श्रीमती गायत्री रमेश पालशेतकर यांच्या घराची संरक्षण भिंत कोसळली आहे. Rain causes major damage in Guhagar

वडद येथील संजय शशिशेखर सोमण यांच्या घराचे छप्पर कोसळले आहे. कौंढर काळसूर येथील अतिवृष्टीच्या कालावधीत सुकाडवाडी येथील सार्वजनिक विहिरीचे बांधकाम पडलेले आहे. यामध्ये 15 हजाराचे नुकसान झाले आहे. मोहितेवाडी येथील प्रभावती गोपाळ मोहिते यांचे घरावर आंब्याच्या झाडाची फांदी पडून नुकसान झाले आहे. आरे बौद्धवाडी येथील बांधकाम स्थितीत असलेला साकव पाण्याच्या प्रवाहामुळे स्टीलसह सेंट्रींग वाहून गेले आहे. नागरिकांना पर्यायी मार्ग सुरु करण्यात आले आहे. भातगाव तिसंग येथील श्रीम. पार्वती शंकर वेले  यांच्या घराशेजारील बांध पावसामुळे कोसळून नुकसान झाले आहे. अंजनवेल बौद्धवाडी येथे रस्त्याच्या बाजूच्या दरडीवरील दगड कोसळली आहे.  रस्त्याच्या खालच्या बाजूला बौद्धवाडी मधील घरे असल्याने नागरिकांनी स्थलांतर होण्यास सांगितले आहे. परचुरी  बौधवाडी मधील विहारीची संरक्षण भिंत पडल्याने  २५ हजाराचे नुकसान झाले आहे.  Rain causes major damage in Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRain causes major damage in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share488SendTweet305
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.