• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी येथे कोषागार दिन साजरा

by Manoj Bavdhankar
February 2, 2023
in Ratnagiri
174 2
0
Treasury Day celebrated at Ratnagiri
342
SHARES
977
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कर्मचाऱ्यांनी काम करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा -लेखाधिकारी बिरादार 

रत्नागिरी ता. 01 : कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी आनंदाने पार पाडल्यास एखादे क्लिष्ट कामही सोपे होवून जाते, असे प्र. श. बिरादार लेखाधिकारी लेखापरीक्षण पथक (शिक्षण) रत्नागिरी यांनी सांगितले. कोषागार दिनाचे औचित्य साधून जिल्हा कोषागार कार्यालय येथे आयोजित ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर व्याख्यानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. Treasury Day celebrated at Ratnagiri

या कार्यक्रमाचा शुभारंभ दिपप्रज्वलन करुन करण्यात आला. यावेळी लेखा व कोषागारे विभागाच्या विभाग व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये जिल्हा कोषागार कार्यालय रत्नागिरीच्या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.  यामध्ये प्रविण बोरकर यांना थाळीफेक मध्ये सुवर्णपदक. कनिष्ठ लेखापाल, संगिता कवाळे २०० मी. धावणे व लांबउडी. गोपाळ पोफळनारे यांना गोळाफेक मध्ये रौप्यपदक. कनिष्ठ लेखापरीक्षक स्थानिक निधी लेखा, विठ्ठल मालंडकर,बुद्धीबळ. सहायक लेखाधिकारी, मयुरी चव्हाण, कॅरम, महिला.  उपलेखापाल,  शशिकांत केतकर, कॅरम, दुहेरी. लेखालिपिक, जयेश कुलकर्णी  लेखालिपिक. टेबल टेनिस दुहेरी, गणेश देशमुख सहायक लेखाधिकारी, साईसंकेत बामणे कनिष्ठ लेखा परीक्षक स्थानिक निधी लेखा.   कास्यपदक,100 मी. धावणे, संगिता कवाळे कनिष्ठ लेखापाल. लांबउडी, भरत आरेकर लेखालिपिक.   सांस्कृतिक द्वितीय क्रमांक, गायन, प्रविण कांबळे, कनिष्ठ लेखापाल.  सामुहिक क्रिडास्पर्धा- संचलन द्वितीय क्रमांक, हॉलीबॉल द्वितीय क्रमांक. 100X4 रिले महिला तृतीय क्रमांक.  अमरावती येथील राज्यस्तरीय स्पर्धा संगिता कवाळे कनिष्ठ लेखापाल, २०० मी. धावणे उपविजेता पदक आदींचा समावेश होता.  Treasury Day celebrated at Ratnagiri

मानसिक ताण हे अनेक शारिरीक आजारांना निमंत्रण देत असते.  अनेक वेळा शुल्लक गोष्टींचा ताण घेणे अतिमहत्वाकांक्षा, इतरांबरोबर स्वत:ची तुलना करणे यामुळे अनेक शारिरीक समस्यांना सुरुवात होते.  हा ताण कमी करण्यासाठी माणसांनी स्वत:ची भूमिका योग्य पध्दतीने व आनंदाने पार पाडावी.  स्वत:साठी वेळ देणे, चांगले छंद जोपासणे, रागावर नियंत्रण ठेवणे, आत्मपरीक्षण करणे इत्यादी माध्यमातून तणाव कमी होण्यास मदत होते असे यावेळी श्री. बिरादार यांनी सांगितले. Treasury Day celebrated at Ratnagiri

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

जिल्हा कोषागार अधिकारी श्री. वाघमारे यांनी कार्यालयीन कामकाजात सांघिक कार्य महत्वाचे असते.  कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे आनंदाने काम केल्यास कार्यालयीन कामकाजात अडथळे निर्माण होत नाहीत. असे सांगून सर्वांना कोषागार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. Treasury Day celebrated at Ratnagiri

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक लेखाधिकारी विठ्ठल मालंडकर यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा कोषागार अधिकारी मा.श. वाघमारे, सहायक संचालक स्थानिक लेखा निधी संदिप पाटील, कोषागार कार्यालयाचे अपर कोषागार अधिकारी रविंद्र मोरे, अनिकेत गावडे, श्रीमती एम.एम.जगदाळे, सहायक नियोजन अधिकारी श्री. वंझारी, लेखाधिकारी उमेश मगदूम तसेच कोषागार कार्यालयातील कर्मचारी आदी उपस्थित होते. Treasury Day celebrated at Ratnagiri

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTreasury Day celebrated at RatnagiriUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share137SendTweet86
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.