रत्नागिरी, ता. 07 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था गत चार वर्षे सातत्याने आपल्या सभासद, हितचिंतक यांच्या प्रत्यक्ष भेटी करिता त्यांच्या जवळ संवाद साधण्याकरिता व संस्थेच्या योजना सर्वांपर्यंत पोहचविण्या करीता “पतसंस्था आपल्या दारी” अशा प्रवास दौऱ्याचे आयोजन करत असते. यावर्षी पतसंस्थेच्या प्रवास दौऱ्याचे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात तालुक्याप्रमाणे आयोजन करण्यात आलेले आहे. Travel tour of Kharvi Samaj Credit Institution

दक्षिण रत्नागिरी तालुका प्रवास दौरा
गुरुवार दिनांक 8 जून,2023 रोजी सकाळी १०.०० वा. पूर्णगड येथे स्थान – श्री.देव महापुरुष मंदिर, नवानगर वाडी, पूर्णगड. (सभेला अपेक्षित समाजबांधव: पूर्णगड व गावडे आंबरे),
दुपारी ०१.०० वा. तुळसुंदे येथे स्थान – श्री.विठ्ठल मंदिर,मावळती वाडी, तुळसुंदे.,
सायंकाळी ६.३०वा. पावस येथे स्थान – श्री. परशुराम मंदिर, पावस.
दक्षिण रत्नागिरी तालुका प्रवास दौरा
रविवार दिनांक,11 जून, 2023 रोजी वरवडे येथे सायंकाळी ०६.३० वा. स्थान:- श्री.राधाकृष्ण मंदिर, वरवडे.
सोमवार दिनांक 12 जून,2023 रोजी कासारवेली येथे सायंकाळी ०६.३० वा. स्थान:- श्री.दत्त मंदिर रंगमंच, कासारवेली.
गुहागर तालुका प्रवास दौरा
रविवार दिनांक 11 जून 2023 रोजी सकाळी10.30 वाजता स्थान – श्री दत्तमंदिर, पालशेत (सभेला अपेक्षित गावातील समाजबांधव : कुडली, काताळे नवानगर, हेदवतड, साखरी आगर, वेळणेश्वर वेळणेश्वर भाटी, कोंड-कारुळ, बुधल, पालशेत, असगोली, वेलदूर, नवानगर ११ तरीबंदर व धोपावे.

दापोली तालुका प्रवास दौरा
सोमवार दिनांक 12 जून, 2023 रोजी सकाळी १०.३० वा. स्थान – श्री.गणेश मंदिर,बुरोंडी (सभेला अपेक्षित समाजबांध- बुरोंडी, लखडतरवाडी व दापोली)
दुपारी 3.00 वा. स्थान – श्री. साई मंदिर,ढोरसई, दाभोळ (सभेला अपेक्षित समाजबांधव- दाभोळ,ओणि व भाटी/दाभोळ ). Travel tour of Kharvi Samaj Credit Institution
या प्रवास दौऱ्यात सर्व संचालक मंडळ सदस्य, प्रशासन वर्ग व समन्वय समिती सदस्य सहभागी होणार आहेत. पतसंस्था आपल्या दारी या प्रवास दौऱ्यात नियोजित सभास्थानी आपण सर्वांनीच उपस्थित राहण्याचे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष, संतोष पावरी, उपाध्यक्ष, सुधीर वासावे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद खडपे अन्य संचालक बंधू-भगिनी, प्रशासन वर्ग व समन्वय समिती सदस्य यांनी केले आहे. Travel tour of Kharvi Samaj Credit Institution
