गुहागर, ता. 18 : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत दिनांक २९/०१/२०२४ ते ०७/०२/२०२४ या १० दिवसांच्या कालावधीत स्वत: चा व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी ट्रॅव्हल आणि टूरिस्ट गाईड मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये ट्रॅव्हल आणि टूरिझम व्यवसायातील संधी, ट्रॅव्हल गाईडची भूमिका, टूरिस्ट गाईड टिप्स आणि तंत्रज्ञान, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, उद्योजकीय सक्षमता, वेळेचे महत्व या विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थींचे अर्ज २४ जानेवारी २०२४ सायंकाळी ०५ वाजेपर्यंत स्वीकारले जातील. Travel and Tourist Free Guide Training
हे प्रशिक्षण सलग असून सकाळी ०९:३० ते सायंकाळी ०५:३० या वेळेत होईल. प्रशिक्षणासाठी ३५ प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण हे मोफत असून चहा नाष्टा जेवण आणि निवासाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली आहे. सदर प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण ते 45 वयोमर्यादेपर्यंत आहे. रत्नागिरी जिल्यातील दारिद्रय रेषेखालील व्यक्ती किंवा उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांचा कुटुंबातील सदस्य, किंवा SECC लाभार्थी किंवा MGNREGA लाभार्थी यांना प्राधान्य असेल. Travel and Tourist Free Guide Training
अर्ज भरण्यासाठी – 1 फोटो, आधारकार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, पॅनकार्ड झेरॉक्स, मतदानकार्ड झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स, उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांचा कुटुंबातील सदस्य असल्यास उमेद अभियान यांचेमार्फत देण्यात येणारे शिफारस पत्र, दारिद्रय रेषेखाली नाव असल्यास दारिद्रय रेषेखाली असल्याचा दाखला कार्यालयीन वेळेत घेवून येणे. अर्ज भरल्यानंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना फोनद्वारे कळविण्यात येईल. Travel and Tourist Free Guide Training
प्रशिक्षणाचा व अर्ज भरण्याचा पत्ता – स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, अष्टविनायक सोसायटीच्या बाजूला, साई नगर, आर.टी.ओ. रोड, कुवारबाव. रत्नागिरी. ( शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी. १० ते सायंकाळी ०५ या वेळेत 9834015522 / 02352 – 299191 क्रमांकावर संपर्क करणे.) Travel and Tourist Free Guide Training