गुहागर, ता. 07 : तालुक्यातील नव्याने रुजू झालेल्या सर्व नवनियुक्त शिक्षण सेवकांचे प्रशिक्षण 4 नोव्हेंबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये आर पी पालशेतकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पालशेत या ठिकाणी होत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे यांनी दीप प्रज्वलन व मान्यवरांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले. Training of teachers in Palshet school
त्यावेळी केंद्रप्रमुख महेंद्र देवळेकर, पालशेत हायस्कूलचे मुख्याध्यापक मनोज जोगळेकर, तज्ञ मार्गदर्शक प्रताप देसले, रवींद्र कुळे, दिनेश जागकर, मनोज पाटील, दशरथ कदम, नरेंद्र देवळेकर, व सर्व नवनियुक्त शिक्षण सेवक उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे 21 व्या शतकातील पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. Training of teachers in Palshet school


सदर नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षणामध्ये शालेय नेतृत्व व व्यवस्थापन, शालेय अभिलेखे सेवाशर्ती व नियमावली, विद्यार्थी लाभाच्या योजना, अध्यापन पद्धतीची स्वायत्तता, बहुस्तरीय व बहुवर्ग अध्यापन पद्धती, अध्यापनाचा अनेक भाषेचा वापर, कला व क्रीडा कथाकथन व अनुभवाधारित अध्यापन एकात्मिक अध्ययन, समावेशित शिक्षण, वंचिताचे शिक्षण, वयानुरूप वर्गात प्रवेश, मुलींचे शिक्षण, प्रारंभिक बाल्यावस्था व संगोपन शिक्षण, अध्ययन पद्धती, अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अध्यापन व मूल्यमापन, सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन, शिक्षण हक्क अधिनियम 2009, बालकाचे हक्क व सुरक्षितता या संदर्भातील कायदे, बहुविध बुद्धिमत्ता सामाजिक व भावनिक शिक्षण आदी अनेक विषयाबाबत माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे. सर्व शिक्षकानी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश मिळविण्यासाठी सातत्याने तयारी करून घ्यावी असे आवाहन केले. Training of teachers in Palshet school
गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब म्हणाले की, स्पर्धेच्या या युगामध्ये राष्ट्राच्या विकासासाठी दर्जेदार शिक्षण आवश्यक आहे, शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शिक्षक विद्यार्थ्यांचे व राष्ट्राचे भवितव्य घडवत असतात. शिक्षकांच्या योगदानामुळे समाजात त्यांना आदराचे स्थान आहे. ज्ञान कौशल्य आणि मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी त्यांना सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाची आवश्यकता आहे. सूत्रसंचालन दिनेश जागकर यांनी केले. Training of teachers in Palshet school