• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पंचायत समितीचे ग्राम रोजगार सेवकांना प्रशिक्षण

by Mayuresh Patnakar
October 15, 2022
in Guhagar
17 0
0
Training of Panchayat Samiti Gram Rozgar Sevaks
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

एक दिवस खामशेतमध्ये घेतला  प्रत्यक्ष कामाचा अनुभव

गुहागर, ता. 15 : पंचायत समिती मार्फत दि.१० ऑक्टोबर  ते १२ ऑक्टोबर २०२२ असे तीन दिवस खास प्रशिक्षण गुहागर तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांना दिले गेले. प्रशिक्षणांर्थीना प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद पुणे येथील श्री. गोपाळ शर्मा सर व श्री. साईराज प्रधान सर हे लाभले होते. Training of Panchayat Samiti Gram Rozgar Sevaks

दि. १० ऑक्टोबर २०२२ रोजी गुहागर येथे पंचायत समिती सभागृहात गट विकास अधिकारी प्रशांत राऊत व प्रमोद केळुस्कर यांच्या सहकार्याने प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला. दुसऱ्या दिवशी खामशेत गावात प्रशिक्षणार्थींना   प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यात आला. गाव फेरी, शिवार फेरी, पाहिजे त्याला काम,  कुटूंब सर्वेक्षण यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सरपंच मंगेश सोलकर यांनी गावामध्ये कशा प्रकारे मनरेगा अंतर्गत कामे केली व त्यासाठी काय काय नियोजन व अंमलबजावणी करावी लागते याबाबत मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणांर्थीना जिल्हा परिषद रत्नागिरीचे नरेगा सहाय्यक कार्यकारी अधिकारी साळुंखे साहेब व जिल्हा परिषद रत्नागिरीचे नरेगा गट विकास अधिकारी जाधव साहेब यांच्या हस्ते प्रमाण पत्र देऊन समारोप करण्यात आला. Training of Panchayat Samiti Gram Rozgar Sevaks

Training of Panchayat Samiti Gram Rozgar Sevaks

यावेळी प्रशिक्षणांर्थीना प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद पुणे येथील श्री. गोपाळ शर्मा सर व श्री. साईराज प्रधान सर हे लाभले होते. यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरण ग्रामरोजगार सेवकांचे कार्य तसेच मनरेगा मार्फत अनेक रोजगार उपलब्ध करून गावातील सर्व घटक, ग्रामस्थ शेतकरी यांचा आर्थिक स्तर वाढवून, गावातील प्रत्येक कुटुंब कसे समृद्ध करता येईल व विकासाच्या दिशेने “स्वतः समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर तालुका, तालुका समृद्ध तर जिल्हा आणि जिल्हा समृद्ध तर पूर्ण महाराष्ट्र समृद्ध” अशा पद्धतीने विकास साध्य करता येईल, असे सांगून त्या करीता अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.  Training of Panchayat Samiti Gram Rozgar Sevaks

Training of Panchayat Samiti Gram Rozgar Sevaks

यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळुस्कर साहेबांनी सुद्धा प्रत्यक्ष भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषी अधिकारी कोळी साहेब,  सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, पंचायत समिती नरेगा विभागाच्या तांत्रिक अधिकारी नयना जाधव मॅडम, गुहागर तहसील विभाग अधिकारी, खामशेत गावचे पोलिस पाटील, ग्रामसेवक तसेच सरपंच श्री. मंगेश सोलकर उपस्थित होते. Training of Panchayat Samiti Gram Rozgar Sevaks

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTraining of Panchayat Samiti Gram Rozgar SevaksUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.