गुहागर,ता. 01 : दि. बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने ग्राम शाखा काजुर्ली-मानवाडी येथील संबोधी बुद्ध विहारात पुरुष-महिला संयुक्त कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष विद्याधर कदम होते. कार्यक्रमास समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर एन. बी. कदम यांनी त्रिशरण, पंचशील आणि बुद्धपूजापाठ घेतला. Training camp at Kajurli-Manvadi

शिबिरात महाराष्ट्र राज्य सचिव, केंद्रीय शिक्षक व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनंत सावंत, जिल्हा सरचिटणीस व केंद्रीय शिक्षक एन. बी. कदम तसेच तालुका महिला अध्यक्षा मनीषा मोहिते यांनी भारतीय बौद्ध महासभेची ध्येय-उद्दिष्टे, संघटनेचे मिशन, शाखांचे कामकाज, हिशोब व्यवस्थापन, कार्यकर्त्यांची आचारसंहिता आणि समाजप्रबोधन यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात विद्याधर कदम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे विचार व कार्य अधिकाधिक समाजबांधवांपर्यंत विविध प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून पोहोचविण्याचे आवाहन केले. Training camp at Kajurli-Manvadi

यावेळी तालुका महिला संघटक विशाखा कदम, कोषाध्यक्ष संजय मोहिते आणि संजय जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आम्रपाली मोहिते यांनी केले, तर समीर जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. Training camp at Kajurli-Manvadi
