• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुपोषण निर्मूलनात गुहागर तालुक्याची गरुडझेप!

by Mayuresh Patnakar
June 26, 2026
in Guhagar
36 1
2
Guhagar taluka's success in eliminating malnutrition
71
SHARES
203
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संपूर्ण जिल्हा कुपोषण मुक्त करण्यात आरोग्य विभागाला मोठे यश

गुहागर, ता. 26 : जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील एकूण मध्यम कुपोषणाचे प्रमाण १.७९ टक्क्यांवरून १.२२ टक्क्यांवर, तर तीव्र कुपोषणाचे प्रमाण ०.१६ टक्क्यांवरून ०.०७ टक्क्यांवर खाली आले आहे. प्रशासनाच्या अहवालात गुहागर तालुक्याने कुपोषण निर्मूलनात गरुडझेप घेतली आहे. Guhagar taluka’s success in eliminating malnutrition

२०२४-२५ मध्ये गुहागर तालुक्यात मध्यम कुपोषित (MAM) बालकांचे प्रमाण तब्बल ४.०६ टक्के इतके उच्चांकी होते, जे प्रशासकीय प्रयत्नांमुळे २०२५-२६ मध्ये घटून अवघे ०.४८ टक्के राहिले आहे. तसेच तीव्र कुपोषित (SAM) बालकांचे प्रमाणही ०.३८ टक्क्यांवरून ०.०५ टक्क्यांवर आणण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील बालकुपोषणाच्या समस्येवर मात करण्यात प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला मोठे यश येताना दिसत आहे. वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत वर्ष २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील ‘मध्यम कमी वजनाच्या’ आणि ‘तीव्र कमी वजनाच्या’ बालकांच्या एकूण टक्केवारीत लक्षणीय घट झाली आहे.  Guhagar taluka’s success in eliminating malnutrition

चिपळूण तालुक्याने तीव्र कुपोषणात उत्कृष्ट कामगिरी करत हे प्रमाण ०.१३ टक्क्यांवरून थेट ०.०० टक्के वर आणले आहे, म्हणजेच चिपळूण तालुका तीव्र कुपोषणमुक्त झाला आहे. दुसरीकडे दापोली आणि खेड तालुक्यांत मात्र कुपोषणाची आकडेवारी चिंतेचा विषय ठरत आहे. खेड तालुक्यात मध्यम कुपोषित बालकांचा दर १.०३ टक्क्यांवरून १.१८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर दापोलीत ‘SAM’ (तीव्र कुपोषित) श्रेणीतील बालके ०.१२ टक्क्यांवरून ०.१६ टक्क्यांवर पोहोचली आहेत. तसेच राजापूर तालुक्यातही तीव्र कुपोषणात ०.०७ टक्क्यांवरून ०.१० टक्के किंचित वाढ झाली आहे. मंडणगड (१.८९ टक्क्यांवरून १.६२ टक्के), रत्नागिरी (१.६७ टक्क्यांवरून १.१६ टक्के), लांजा (२.५६ टक्क्यांवरूनन १.०८ टक्के) आणि राजापूर (२.५८ टक्क्यांवरून १.३९ टक्के) या तालुक्यांत मध्यम कुपोषणाचे प्रमाण घटले आहे. जिल्हा परिषद, अंगणवाड्या आणि बालविकास प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनांचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे दिसून येत आहे. Guhagar taluka’s success in eliminating malnutrition

Tags: GuhagarGuhagar NewsGuhagar taluka's success in eliminating malnutritionLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share28SendTweet18
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.