गुहागर, ता. 25 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारतळीकडून सामाजिक बांधिलकी जपत वेळणेश्वर येथे खास बचतगट महिलांसाठी एकदिवशीय मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. Training at Velaneshwar by Regal College

या कार्यक्रमामध्ये प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांनी रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांचे पुष्प देऊन स्वागत केले. प्रा. सौ. रेश्मा मोरे यांनी रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये उपलब्ध असलेल्या विविध व्यावसयिक उपक्रमांची माहिती दिली. त्याचप्रमाणे शिक्षण घेताना उपलब्ध असलेल्या रोजगारांच्या संधीबद्दल माहिती दिली. सौ. नेत्रा ठाकूर यांनी महिलांसाठी मोफत प्रशिक्षण दिल्याबद्दल रिगल कॉलेजचे आभार मानले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत वेळणेश्वर वाडदईचे सरपंच श्री. चैतन्य धोपावकर यांनी महिला बचत गटाचा इतिहास सांगितला. महिला हि कोणत्याही क्षेत्रात कमी नाही असे सांगून त्यांनी वेळणेश्वर पंचक्रोशीतील महिला सक्षमीकरणाचे श्रेय हे सौ. नेत्रा ठाकूर यांना दिले. Training at Velaneshwar by Regal College

वेळणेश्वर हे पर्यटन स्थळ असल्याने येथील महिलांना व्यवसायास चालना मिळण्यासाठी रिगल कॉलेज शृंगारतळीच्या १००% नोकरीची हमी देणाऱ्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे शाही पनीर, पनीर मक्खनवाला, बटर चिकन, चिकन कोल्हापुरी तसेच शेवपुरी, दहीपुरी, सँन्डविच इ. पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच फॅशन डिझाईनिंग विभागातर्फे महिलांना हेअरस्टाईल व बेसिक मेकउपचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच विशेष उपक्रमांतर्गत रिगल कॉलेज शृंगारतळी BCA (बॅचलर ऑफ कॉम्पुटर अॅप्लीकेशन)च्या NSS विभागातर्फे वेळणेश्वर समुद्र किनारा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले व नर्सिंग केअर व डी.एम, एल. टी. विभागातर्फे महिलांचा मोफत हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. या प्रशिक्षणांतर्गत वेळणेश्वर पंचक्रोशीतील बहुसंख्य महिलांनी निरनिराळे पदार्थ बनविले व त्याचा आस्वाद घेतला. Training at Velaneshwar by Regal College

या प्रशिक्षणासाठी ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर सरपंच श्री.चैतन्य धोपावकर, उपसरपंच श्री.अमोल जामसुतकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर, सीआरपी प्रतिनिधी सौ. संपदा केळकर तसेच वेळणेश्वर वाडदई सर्व ग्रामसंघाचे अध्यक्ष व सचिव तसेच वेळणेश्वर शाळा नं.१ चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. Training at Velaneshwar by Regal College
यावेळी वेळणेश्वर गावातील महिला व विद्यार्थीनी तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, रिगल कॉलेज शृंगारतळीचे विद्यार्थी व सहकारी शिक्षकवृंद उपस्थित होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. Training at Velaneshwar by Regal College
