दहशतवाद विरोधी शाखा, रत्नागिरी पथकाने केली कारवाई
रत्नागिरी, ता. 14 : मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. Trafficking in wildlife
दि. 10/08/2023 रोजी दापोली पोलीस ठाणे हद्दीमधील सोंडेघर ते मंडणगड रोड वरील शिरखल आदिवासी वाडी येथे एक इसम हा (वन्यजीवी प्राणी, खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करिता वाहतूक करणार आहे) अशी विश्वसनीय बातमी मिळाली. त्यानुसार लागलीच दहशतवाद विरोधी शाखा रत्नागिरी येथील सहायक पोलीस निरीक्षक, श्री. भरत पाटील व पथक यांनी वन विभागाशी संपर्क साधून दापोली वन विभाग येथील वन रक्षक श्री. गणपती महादेव जळणे यांना सोबत घेऊन छापा टाकला. या छाप्यामध्ये बाळा गणपत लोंढे, वय ८२, रा. कोर्टीवाडी, पालगड, ता. दापोली, जि. रत्नागिरी हा सोंडेघर ते मंडणगड जाणाऱ्या रोडवरील शिरखल आदिवासी फाटा, पालगड येथे मौल्यवान किंमतीची वन्यजीव खवले मांजराची खवले तस्करीच्या उद्देशाने, बेकायदेशीरपणे स्वत:च्या ताब्यात बाळगून त्याची विक्री करण्यासाठी वाहतूक करीत असताना मिळून आला. Trafficking in wildlife

या कारवाई दरम्याने दहशतवाद विरोधी शाखेने आरोपीत बाळा गणपत लोंढे यांच्या ताब्यातील मौल्यवान किंमतीची ११.६७८ कि. ग्रॅ. वजनाची वन्यजीव खवले मांजर याची खवले जप्त केली आहेत व आरोपीस गुन्हयाच्या कामी अटक करण्यात आलेली आहे. तसेच दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं. 129/2023 वन्य जीव(संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, 44, ४९(ब), व 53 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्यामधील वन्यजीवी प्राण्याची (खवले मांजराची) हत्या/शिकार कोठे झाली आहे? याचा अधिक तपास दापोली पोलीस ठाणे मार्फत करण्यात येत आहे. Trafficking in wildlife
ही कारवाई स.पो.नि., श्री. भरत पाटील, दहशतवाद विरोधी शाखा, रत्नागिरी, पोहवा /1491 राजेश भुजबळराव, पोहवा/1162 उदय चांदणे, पोहवा/473 लक्ष्मण कोकरे, पोहवा /829 महेश गुरव, पोहवा /409 आशीष शेलार, सपोफौ/ 65 प्रशांत बोरकर, सुरक्षा शाखा, पोहवा /1554 ओंकार सावंत, सुरक्षा शाखा व वन रक्षक श्री. गणपती जळणे, दापोली वन विभाग या पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी केलेली आहे. Trafficking in wildlife
