गुहागर, ता. 18 : चिपळूण- गुहागर मार्गावरील मार्गताम्हाने शाळेजवळील वाहतूक धोकादायक बनत असून येथील रस्त्यावर दोन गतिरोधक बसवावेत, अशी मागणी शिक्षण संस्था, पालक यांनी केली आहे. Traffic near Margtamhane School is hazardous

मार्गताम्हाने येथे महामार्गानजीक दोनही बाजूला शाळा आहेत. एका बाजूला डाँ. नातू प्रतिष्ठानची इंग्रजी माध्यमाची शाळा तर दुसऱ्या बाजूला मार्गताम्हाने शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालय व महाविद्यालय आहे. चिपळूण-गुहागरकडून ये-जा करणारी वाहने या भागात सुसाट धावत असतात. त्यांना शाळा जवळ असल्याचे फलकही दिसत नाहीत. येथेच बसथांबा आहे. दोनही बाजूने शाळेत ये-जा करण्यासाठी मुलांना हा महामार्ग ओलांडावा लागतो. मुलांना ने-आण करण्यासाठी आलेली पालकांची वाहनेही रस्त्याच्या कडेने असतात. अशावेळी धावणारी वाहने लगेच लक्षात येत नाहीत. कित्येक वेळा शिक्षक, कर्मचाऱ्यांना मुलांना रस्ता ओलांडून द्यावा लागतो. या ठिकाणी अपघाताची शक्यता असून दोन गतिरोधक बसविणे गरजेचे आहे. तशी मागणी शाळा प्रशासनाने पत्राद्वारे केलेली आहे. Traffic near Margtamhane School is hazardous
