गुहागर, ता. 11 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सप्तक हा वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव सुरु आहे. या अंतर्गत पारंपरिक वेशभूषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पारंपरिक कोकणी वेशभूषा, संस्कृती, धार्मिक विधी यांचे सादरीकरण विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. Traditional Dress Day at velneshwar College
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ढोल ताशांच्या गजरात रामाची प्रतिमा पूजन करून मिरवणूक काढण्यात आली. प्रा. सतिश घोरपडे व इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी प्रभू रामचंद्रांची आरती व भजन सादर केले. मेकॅनिकल व सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांनी पंढरपूरच्या वारीचे दर्शन सर्वांना घडवून आणले. या वारीमध्ये मुलांनी वारकरी पोशाख केला होता, तर मुलींनी पारंपरिक नऊवारी साडी व डोक्यावर तुळस असा सहभाग घेतला. या वारकऱ्यांनी पारंपरिक ढोलकी, टाळ अशी वाद्दे वापरली. रिंगण, भजन, फुगडी यांचे सादरीकरण करताना हे वारकरी विठूनामामध्ये तल्लीन झाले होते. कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव चे सादरीकरण इंस्ट्रुमेंटेशन व इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी केले. Traditional Dress Day at velneshwar College
यावेळी प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गणपतीची आरती व भजन सादर केले. विद्यार्थिनींनी गणपतीच्या विविध रांगोळ्या काढून आपली कला सादर केली. याचबरोबर बाप्पाचा गोड प्रसाद सर्वांना वाटप करण्यात आला. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. योगेश काटदरे व प्रा. प्रीती साठे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. सिविल विभागप्रमुख प्रा. नंदकिशोर चौगुले, ऑफिस प्रमुख श्री. हृषीकेश गोखले, उपप्राचार्य प्रा. अविनाश पवार व प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. Traditional Dress Day at velneshwar College