• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हर्षा हॉलिडेजला पर्यटन मित्र पुरस्कार

by Guhagar News
September 28, 2022
in Ratnagiri
17 0
0
Tourism Friend Award to Harsha Holidays
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते ठाकुरदेसाई यांनी स्विकारला

रत्नागिरी, ता. 28 : येथील हर्षा हॉलिडेजला पर्यटन संचालनालयाला (उपसंचालक कार्यालय, कोकण विभाग) पर्यटन मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार जागतिक पर्यटन दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे देण्यात आला. अल्पबचत सभागृहात आयोजित जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते संचालक सुहास ठाकुरदेसाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. Tourism Friend Award to Harsha Holidays

मैत्री ग्रुपच्या माध्यमातून संचालक सुहास ठाकुरदेसाई आणि कौस्तुभ सावंत यांनी २०१७ मध्ये हर्षा हॉलिडेजची स्थापना केली. याचा मुख्य उद्देश हा होता की कोकणचे पर्यटन वाढवणे, कोकणात जास्तीत जास्त पर्यटक येण्याकरता मुंबई, पुणे येथे वेगळयावेगळया प्रदर्शनात सहभाग घेतला. नंतर रत्नागिरीमध्ये पर्यटकांचा मुक्काम वाढण्यासाठी हर्षा स्कुबा डायव्हिंगची प्रथमच सुरवात केली. याला पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. यानंतर त्यांना एमटीडीसीचा पर्यटन मित्र हा पुरस्कार सुहास ठाकुरदेसाई यांना प्राप्त झाला. नंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले. गाईड प्रशिक्षण कार्यक्रम, कोकणी खाद्यपदार्थांची स्पर्धा, पर्यटन परिषद, टुर ऑपरेटर व्हिजिट असे अनेकविध उपक्रम राबवले. यामुळे रत्नागिरीत गेल्या काही वर्षांत पर्यटनाला चांगले दिवस येऊ लागले आहेत. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे श्री. माळी, संजय यादवराव आदी मान्यवर उपस्थित होते. Tourism Friend Award to Harsha Holidays

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTourism Friend Award to Harsha HolidaysUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.