• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नवानगरमध्ये घरोघरी तिरंगा अभियान

by Mayuresh Patnakar
July 24, 2022
in Guhagar
16 1
0
Tiranga Abhiyan in Nawanagar
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जनजागृती रॅलीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गुहागर, ता. 24 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर मराठी येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये घरोघरी तिरंगा कार्यक्रमांतर्गत शाळा ते श्रीराम मंदिर पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीचा समारोप ग्रामस्थांना नारळाची रोपे वाटून करण्यात आला. नवानगर मराठी शाळेत आयोजित केलेल्या रॅलीमध्ये सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक संघ, माता संघ व 115 विद्यार्थ्यांसह देशभक्ती व राष्ट्राभिमानाने भारावून गेलेले शेकडो ग्रामस्थ, युवक युवती, स्वयंसेवी संस्था पदाधिकारी सहभागी झाले होते.  देशभक्तीपर घोषणा देत व गाणी गाऊन विठ्ठलवाडी, रोहिलकरवाडी, वनकर वाडी, मोहल्ला परिसरात घरोघरी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षात घरोघरी ध्वजारोहण करावे असा संदेश देण्यात आला. Tiranga Abhiyan in Nawanagar

रॅलीचा समारोप नवानगर शाळेत झाला. यावेळी सिद्धी ट्रस्ट संचलित शालेय परिसर विकास प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. 178 ग्रामस्थांना नारळाची रोपे देऊन त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी बोलताना ग्रामविकास अधिकारी आर. बी. कुळे म्हणाले की, वेलदूर नवानगर शाळेत वेळोवेळी अनेक उपक्रम राबविल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासात मोलाची भर पडत आहे. शाळेसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू. या शाळेचा आम्हाला अभिमान वाटतो. माजी सरपंच नंदकुमार रोहीलकर यांनी शाळेच्या प्रगतीबाबत गौरवोद्गार काढले. Tiranga Abhiyan in Nawanagar

Tiranga Abhiyan in Nawanagar

या रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते देवराम भोसले, शिक्षण तज्ञ शंकर कोळथरकर, दिलीप दाभोळकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, माता पालक संघ उपाध्यक्ष ऋतुजा रोहितकर, पालक संघ उपाध्यक्ष अस्मिता नाटेकर, शाळा व्यवस्थापक समितीच्या उपाध्यक्ष सुषमा रोहिलकर, सत्वशीला जगदाळे, पल्लवी घुले, अंजली मुद्दमवार, निलोफर शेख, विशाखा नाटेकर, सुवर्णा कोळथरघर, अंगणवाडी सेविका मत्स्यगंधा कोळथरकर आदी उपस्थित होते. Tiranga Abhiyan in Nawanagar

मुख्याध्यापक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्वशीला जगदाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली. Tiranga Abhiyan in Nawanagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTiranga Abhiyan in NawanagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.