रत्नागिरी,ता. 01 : येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरामध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी लोकमान्य टिळक व भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. Tilak death anniversary at Abhyankar School

लोकमान्य टिळक जयंतीदिनी म्हणजे 23 जुलैला प्रत्येक वर्गात लोकमान्य टिळकांविषयी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण पुण्यतिथीदिनी करण्यात आले. कार्यक्रमात शाळेतील ३६ विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके देण्यात आली. आजच्या कार्यक्रमात प्रत्येक इयत्तेच्या प्रथम क्रमांकप्राप्त विद्यार्थ्याने भाषण केले. कार्यक्रम इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांची बालसभा घेऊन साजरा करण्यात आला. बालसभेचे अध्यक्षस्थान अन्वित डांगे याने भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना मलुष्टे हिने केले तर विद्या लिंगायत हिने आभार मानले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे, प्रशस्तीपत्रकप्राप्त विद्यार्थ्यांचे तसेच बालसभेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. Tilak death anniversary at Abhyankar School

वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांची नावे
इयत्ता पहिली :- प्रथम- प्रार्थना गुरुप्रसाद बोरकर, द्वितीय- श्रीशांत प्रशांत दिवाडकर, तृतीय- सान्वी सुरज गावखडकर, उत्तेजनार्थ- देवाशिष अमोल जोशी, प्रीती दीपक कोळगे, लावण्या सागर मायंगडे, रेयांश मकरंद पेजे, शर्व सचिन गावडे, मोहित महेंद्र सुवरे.
इयत्ता दुसरी :- प्रथम- श्रीरंग नीलेश दामले, द्वितीय- सुमुख सचिन काळे, तृतीय- मनवा मकरंद मालप, उत्तेजनार्थ- वरद प्रमोद गावखडकर, अवनिश गणेश फडके, ओजस्या ओंकार गोगटे, ओवी रुपेश साळवी, गौरी शैलेश शेट्ये, चैतन्य संदीप लिंगायत.
इयत्ता तिसरी :- प्रथम- स्पृहा तेजराज भावे, द्वितीय- अन्वित रुपेश डांगे, तृतीय- आराध्य संकेत महाडिक, उत्तेजनार्थ- दुर्वा मंगेश मुरुडकर, गार्गी मंदार देवल, स्वरा सुधीरकुमार थोरात, ध्रुव मंगेश बुरोंडकर, आदित्य राजेश घडशी, आदित्य विद्याधर गोठणकर, चिन्मय मकरंद दामले.
इयत्ता चौथी :- प्रथम- अर्णव मकरंद पटवर्धन, द्वितीय- स्वरा दुर्वेश साळुंखे, तृतीय (विभागून)- निधी शेखर जोशी, निर्मयी निलेश जोशी, उत्तेजनार्थ- मुद्रा प्रसाद जोशी, रिद्धी विनोद पवार, मानस प्रसाद लिंगायत, आस्था अमित कांबळे, आरोही योगेश आलिम. Tilak death anniversary at Abhyankar School
