तालुकाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची पालकमंत्र्यांना निवेदन
गुहागर, ता. 22 : गुहागर विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी कृषी बाजार समितीची स्थापना करावी, अशी मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाचे युवासेना तालुकाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दिले आहे. There should be an agricultural market committee for farmers.


गुहागर विधानसभा क्षेत्रातील चिपळूण तालुक्यातील उभळे, तनाळी, पाली, मडाळ, कळमुंडी, तनाळी, आंबेरे, गुढे, डूगवे, चिवेली, गोंधळे अशा गावांमध्ये कोणतेही व्यवहारिक साधन नसल्यामुळे या गावातील शेतकरी मागे पडत आहेत. शेतकरी शेतीकडे वळून त्यामधून उत्पन्न मिळावे व यासाठी गावोगावी बैठक घेऊन कृषी बाजारसमिती साठी प्रयत्न सुरु आहेत. ग्रामीण भागामध्ये पाणीसाठे मोठ्या प्रमाणात आहेत, तरी तेथील शेतकरी अनेक प्रकारच्या भाजीपाला, फळे यांची शेती करतो पण ते विकण्यासाठी व विकत घेण्यासाठी बाजार नसल्यामुळे शेतकरी खूप हतबल होत आहे. त्यामुळे या भागाला बाजार समिती मिळावी, अशी मागणी विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. There should be an agricultural market committee for farmers.