गुहागर, ता. 17 : तालुक्यातील आरे श्री धारदेवी मंदिराजवळील असलेल्या मोबाईल टॉवरच्या शेल्टर रूममधील ९२ हजार रूपये किंमतीच्या तब्बल २४ इन्हरटर बॅटऱ्या चोरीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी तीघांना अटक केली आहे. Theft of 24 inverter batteries in Aare
गुहागर पोलिस ठाण्यामध्ये गुरूवारी रात्री ११ वाजता याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.१५ वाजताच्या दरम्याने तालुक्यातील आरे गावातील श्री धारदेवी मंदिरानजीक असलेल्या व्हीआय, जीओ आणि बीएसएनएल टॉवरचे शेल्टर रूममध्ये असलेल्या टॉवर व्हिजन इंडीया प्रा. लि. पुणे कंपनीकडून आलेल्या आमरराजा कंपनीच्या एकूण २४ इन्हरटर बॅटऱ्या कोणीतरी अज्ञात इसमाने शेल्टर रूमचा दरवाजा हत्याराने उचकटुन काढून चोरून नेल्या. सदर बॅटऱ्यांची ९२ हजार किंमत असून याप्रकरणी गुहागर पोलिसांनी भादवी कलम २०२३ चे कलम ३३१- ३,३३१(२) (४), ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Theft of 24 inverter batteries in Aare
याप्रकरणी उपनिरिक्षक सुजित सोनावणे अधिक तपास करत आहेत. याप्रकारणी रोहित प्रसाद देवकर (वय २७), सिद्धांत स्वप्नील भोसले (वय २१), राहणार आरेगाव, विवेक संतोष मालगुंडकर, राहणार पालपेणे मधलीवाडी या तीघांना अटक करण्यात आली आहे. Theft of 24 inverter batteries in Aare