• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 November 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर परचुरी ग्रामदेवता मंदिरात चोरी

by Mayuresh Patnakar
September 29, 2026
in Guhagar
321 4
2
Theft in village deity temple
631
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सीसीटीव्ही कॅमेर्‍यात अज्ञात चोरटा कैद; आरोपीचा शोध सुरू

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील परचुरी येथील श्री भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिरातून सुमारे ३२ हजार रुपये किमतीचे दोन ऍम्प्लिफायर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ही चोरी २६ सप्टेंबर रोजी रात्री ९.०५ ते ९.२६ वाजेच्या दरम्यान झाली असावी. या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Theft in village deity temple

परचुरी भुवडवाडी, ता. गुहागर येथील श्री भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिरात धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी ऍम्प्लिफायरचा वापर केला जातो. मंदिरातील दोन ऍम्प्लिफायर मशीन चोरीला गेले असून, त्यांची एकूण किंमत ३२ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. Theft in village deity temple

भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा तक्रारदार रामचंद्र धोंडू आडविलकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, २६ सप्टेंबर रोजी रात्री ९.०५ ते ९.२६ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने मंदिरातील दोन्ही ऍम्प्लिफायर चोरून नेल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्याच्या आधारे संशयित व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. Theft in village deity temple

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरी करणार्‍या व्यक्तीची ओळख पटण्याची शक्यता असून, लवकरच संशयिताला ताब्यात घेण्यात येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल लुकमान सुजात तडवी यांच्यासह हेड कॉन्स्टेबल राजेश धनावडे, किशोर साळवी अधिक तपास करीत आहेत. Theft in village deity temple

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTheft in village deity templeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share252SendTweet158
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.