गोविंद मोबाईल शॉपी २७ लाखाची मोबाईल चोरी प्रकरण; चोरटयांच्या भाव पोलिसांच्या ताब्यात
गुहागर, ता. 04 : तालुक्यातील शृंगारतळी येथील गोविंदा मोबाईल शॉपीमधील २७ लाखाच्या बंपर चोरीमधील चोरटे निघाले झारखंडमधील गुहागर पोलिसांनी गेले २० दिवस केलेल्या तपासामध्ये चोरट्यांचा पत्ता मिळवीला. मात्र चोरटे हाती लागले नाहीत. परंतु त्यांना सहकार्य करणारा व त्यामध्ये सहभागी असलेला संशयीत म्हणून त्यांच्या भावाला गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहीती उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने यांनी दिली. Theft in Sringaratali
तालुक्यातील शृगारतळीमधील गोविंदा मोबाईल शॉपीमधील २७ लाखाचे मोबाईल व ९० हजाराची रोकड चोरी गुहागर पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजबरोबर चिपळुण बाजारपेठेतील विविध चोऱ्या, चोरी करण्याचा केलेला प्रयत्न. एका हार्डवेअरमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये साहित्य घेतानाच फुटेज मिळून आले. त्यानंतर एसटी बस स्थानक, रेल्वेस्टेशन आदी भागातही त्यांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून अखेर आरोपी नक्की कोण याचा शोध लावण्यात त्यांना यश आले आहे. या तपासामध्ये झारखंड येथे पोहचून त्या चोरांचे घर गाठले. मात्र या चोरीमध्ये सहभागी असल्याचा संशय धरून त्याच्या भावाला ताब्यात घेतले आहे. कमी पगारामध्ये नोकरदार मिळवून त्याची संपूर्ण माहीती न घेता अनेक ठिकाणी कामगार ठेवले जात आहेत. यामुळे अशा संशयीत गुन्हेगार चोरीचे कृत्य करत आले आहेत. या प्रकरणी गुहागर पोलिसांचा सखोल तपास सुरू असून लवकच उर्वरीत चोरटे हाती लागलीत असा विश्वास विभागीय पोलिस अधिकारी श्री. राजमाने यांनी व्यक्त केला. Theft in Sringaratali