प्रवेश निश्चितीसाठी दि. 18 ऑगस्टपर्यंत संपर्क साधावा
रत्नागिरी, ता.10 : खल्वायन संस्थेमार्फत २१ ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत कै. चंद्रशेखर जोशी स्मृतीप्रित्यर्थ नाट्य कार्यशाळा (ओळख नाटकाची) आयोजित केली आहे. ही कार्यशाळा जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर वसतीगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात घेतला जाणार आहे. कार्यशाळेचे प्रवेशशुल्क रु. 200/- आहे. यामध्ये प्रवेश मर्यादित असून सहभाग निश्चितीसाठी दि. 18 ऑगस्टपर्यंत वामन जोग 9881125608, श्रीनिवास जोशी 9422473080 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. Theater workshop in Ratnagiri


संस्थेचे हरहुन्नरी कलाकार कै. चंद्रशेखर जोशी यांनी संगीत व गद्य राज्य नाट्य स्पर्धेच्या पूर्वी नवोदित कलाकार, संस्थांना माहिती देण्याकरिता नाट्य कार्यशाळा करावी, अशी संकल्पना गतवर्षी मांडली होती. परंतु त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून प्रथमच अशी नाट्य कार्यशाळा खल्वायन संस्थेतर्फे आयोजित केली आहे. Theater workshop in Ratnagiri
नाटक म्हणजे काय, त्याचे घटक, नाट्यवाचन, वाचिक, कायिक, सात्विक, भाषाप्रभुत्व, स्मरणशक्ती वृध्दी आणि त्यासाठीचे व्यायाम, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, रंगमंचावरील वावर व समयसूचकता, नटाने पाळायचे नियम, नाटकाचा उद्देश, सफलता आणि करीयर संधी, प्रश्नोत्तरे व शंकासमाधान असे कार्यशाळेचे स्वरूप आहे. Theater workshop in Ratnagiri
या कार्यशाळेमध्ये 12 वर्षांपुढील सर्व स्त्री पुरुषांना प्रवेश आहे. दुपारी भोजनासाठी शिबीरार्थीनी घरून डबा आणावा. ज्यांना शक्य नाही त्यांना फक्त रु. 70/- शुल्क आकारू डाळ-तांदूळ खिचडी देण्यात येईल. सकाळ सत्र व दुपार सत्रात चहापानाची सोय आयोजकांमार्फत केली आहे. कार्यशाळेचे प्रवेशशुल्क रु. 200/- आहे. यामध्ये प्रवेश मर्यादित असून सहभाग निश्चितीसाठी दि. 18 ऑगस्टपर्यंत वामन जोग 9881125608, श्रीनिवास जोशी 9422473080 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. Theater workshop in Ratnagiri


कार्यशाळेत प्रा. विजयकुमार रानडे, पेंटर नंदू सोहनी, वामन जोग, अनिल दांडेकर, अमेय धोपटकर मार्गदर्शन करणार आहेत. वामन जोग हे 45 वर्षे नाट्यकर्मी असून कलाकार व दिग्दर्शनाची 39 पारितोषिके मिळाली आहेत. टीव्ही मालिका, चित्रपट, नाटकांत त्यांनी अभिनय केला आहे. मोरेश्वर तथा नंदकुमार सोहनी हे १९७३ पासून रंगभूषा, नेपथ्य, वेषभूषा या व्यवसायात कार्यरत आहेत. प्रा. विजयकुमार रानडे हे गोगटे- जोगळेकर कॉलेज निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांचे गुरुवर्य प्रा. भालबा केळकर असून त्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्यशिक्षण या सूत्रावर आधारित अनेक कार्यशाळा घेतल्या. १९७२ ते १९७८ या कालावधीत पुण्यात विविध नाटकांमध्ये, शॉर्ट फिल्ममध्ये त्यांनी काम केले. अनिल दांडेकर हे रत्नागिरीत ४० वर्षे रंगकर्मी, ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक आहेत. त्यांची मित्र फाउंडेशन ही संस्था असून सेतू या नाटकाच्या लेखनासाठी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे. अमेय धोपटकर हे युवा कलाकार असून महाविद्यालयीन काळात त्यांनी सकाळ महाकरंडकमध्ये अंतिम विजेता आणि वाचिक अभिनयाचे सर्वोत्तम राज्यस्तरीय बक्षीस पटकावले आहे. अनेक एकांकिकांसाठी त्यांनी पारितोषिके मिळाली आहेत. Theater workshop in Ratnagiri