वृक्षसंवर्धनासाठी केला जातो 15 लाखांचा खर्च
गुहागर, ता. 27 : भारतातील मध्यप्रदेश राज्यात एका झाडासाठी 365 दिवस, 24 तास 2 पोलीस संरक्षण देतात. जिल्हा उद्यान तज्ञ या झाडाची कायम तपासणी करतात. झाडाला गोलाकार कुंपण घालण्यात आले आहे. झाडाच्या निगराणीसाठी मध्यप्रदेश सरकार वर्षाला 15 लाख रुपये खर्च करते. कोणत आहे हे झाडं, का केलाय जातोय या झाड्यावर इतका खर्च, त्याच महत्त्व काय आहे. हे सर्व आज आपण समजून घेवू या. The Tree under Police Protection


मध्यप्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील सलामतपूर गावाशेजारी सांची येथील बौध्द विद्यापीठातील एका टेकडीवर हा बोधीवृक्ष आहे. भगवान बुद्धांनी याच वृक्षाखाली बसून तपस्या केली होती. म्हणून बोधीवृक्षाला बुद्ध धर्मात सर्वाधिक महत्त्व आहे. या बोधी वृक्षाची कथा सुरु होते 21 सप्टेंबर 2012 या तारखेपासून. श्रीलंकेचे तत्कालिन राष्ट्रपती महेंद्रा राजपक्षे यांनी श्रीलंकेतील बोधीवृक्षाची फांदी आणून तिचे बौध्द विद्यापीठातील टेकडीवर रोपण केले आहे. The Tree under Police Protection


राष्ट्रपती राजपक्षे यांनी दिलेला वृक्ष याही पेक्षा आणखी एक मनोरंजक इतिहास आहे. 2500 वर्षांपूर्वी भगवान बुद्धांना ज्या वृक्षाखाली तपस्या केल्यानंतर ज्ञान प्राप्ती झाली त्या वृक्षाचे दर्शन सम्राट अशोक यांनी घेतले. आपल्या अध्यात्मिक गुरुने तपस्या केलेल्या जागी सम्राट अशोक यांनी मंदिर बांधले. या पवित्र वृक्षाची एक फांदी त्यांनी श्रीलंकेतील त्या काळातील राजा देवनमपिया तिसा यांना भेट म्हणून पाठवली होती. बौध्द धर्माचे पालककर्ते राजा देवनमपिया यांनी अत्यंत श्रध्देने भगवान बुद्धांची आठवण असलेली ही फांदी आपल्या राज्याच्या राजधानीत अनुराधापुरमध्ये लावली. पुढील काळात श्रीलंकेत आलेल्या सर्व शासनकर्त्यांनी या बोधीवृक्षाचे संगोपन केले. काळजी घेतली. याच बौधीवृक्षाची एक फांदी श्रीलंकेचे राष्ट्रपती महेंद्रा राजपक्षे यांनी सप्टेंबर 2012 मध्ये भारत दौऱ्यावर येताना सोबत आणली. भूतान चे तत्कालीन प्रधानमंत्री जिग्मी योजर थिंगले आणि मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत रायसेन जिल्हातील सलामतपूर गावाशेजारी सांची येथील बौध्द विद्यापीठातील एका टेकडीवर ही फांदी लावण्यात आली. The Tree under Police Protection


बोधीवृक्षाचे धार्मिक महत्त्व, इतिहासातील सम्राट अशोक यांचा संदर्भ आणि श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी दिलेले प्रेमाचे प्रतिक या पार्श्र्वभुमीवर मध्यप्रदेश सरकारने या बोधीवृक्षांचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण करण्याचे निश्चित केले. म्हणूनच वर्षातील 365 दिवस, 24 तास पोलीसांचा जागता पहारा येथे असतो. रायसेन जिल्ह्याचे उद्यान अधिकारी यांच्या मार्फत या वृक्षाचे संगोपन केले जाते आहे. दर 15 दिवसांनी या वृक्षाचे निरीक्षण केले जाते. आवश्यक त्या उपाय योजना केल्या जातात. त्यासाठी मध्यप्रदेश सरकार वर्षाला सुमारे 15 लाख रुपये खर्च करते. फांदीच्या रुपात 10 वर्षांपूर्वी लावलेल्या झाडाचे रुपांतर आता 22 फूट उंच अशा वृक्षात झाले आहे. दरवर्षी भारतासह अन्य देशातील पर्यटक, बौध्द धर्मिय या स्थानाला भेट देण्यासाठी येतात. The Tree under Police Protection