अखेर शीर आंबेकरवाडीतील ग्रामस्थांनी गाठले पोलीस स्थानक
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील शीर भाटल्यातील आंबेकरवाडी येथील नळ पाणी योजनेचा पाईप चोरीला गेल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. यासंदर्भात वाडीतील ग्रामस्थांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. The tap water scheme pipe was stolen
या तक्रारीत म्हटले आहे की, शिर भाटल्यातील आंबेकरवाडीतील नळपाणी योजना ही गेली २३ वर्षे चालू आहे. वाडीची सार्वजनिक विहीर असून ती शासकीय योजनेतून म्हणजेच जवाहर रोजगार योजनेतून बांधण्यात आलेली आहे. पाण्याची साठवण टाकीला सुद्धा जवाहर रोजगार योजनेतून निधी देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शीर ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोग निधीतून “हर घर जल” योजने अंतर्गत नळ कनेक्शनसाठी निधी देण्यात आलेला असून सदर पाईपलाईन व “हर घर जल”चे काम १२ नोव्हेंबर २०२३ पासून झाले. १६ नोव्हेंबर रोजी काम पूर्ण करून सर्व लोकांना घरोघरी नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. त्या नळ कनेक्शन वरून लोकांनी २५ नोव्हेंबर पर्यंत पाणी भरले. The tap water scheme pipe was stolen


परंतु, दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते १० वा. च्या दरम्यान वाडीतील बबन सोनू आंबेकर, महादेव सोनू आंबेकर, गणपत सोनू आंबेकर, वसंत विश्राम आंबेकर, सोनू धर्मा आंबेकर, प्रकाश सोनू आंबेकर, महेश सोनू आंबेकर, सुभाष सोनू आंबेकर, मिलिंद बबन आंबेकर, तृप्ती गणपत आंबेकर या सर्व लोकांनी मिळून ग्रामपंचायत स्तर १५ वा वित्त आयोग या निधीतून ग्रामपंचायत मार्फत टाकण्यात आलेला पाईप कापून काढण्यात आलेला असून त्या पाईपला बसवण्यात आलेले ब्रांसचे( पितळेचे ) वॉल चोरीला गेले असून सदर पाईप जागेवर दिसत नाहीत. त्याचप्रमाणे सार्वजनिक विहिरीतील इलेक्ट्रिक पंप बाहेर काढून फेकण्यात आला असून पंपाचा पाईप कापण्यात आला आहे. त्यामुळे वाडीचा पाणीपुरवठा बंद झाला असून नागरिकांचे पाणी पिण्याचे हाल झाले आहेत. पाणीपुरवठा बंद करणाऱ्या लोकांवर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात यावा आणि सर्व ग्रामस्थांना योग्य तो न्याय मिळावा, अशी विनंती शिर भाटले आंबेकर वाडीतील ग्रामस्थ यांनी केले आहे. गुहागर पोलिसांना दिलेल्या निवेदनावर सुरेश आंबेकर, शिवराम आंबेकर, प्रकाश आंबेकर, शुभम आंबेकर, गंगाराम आंबेकर यांच्यासह ५० नागरिकांच्या सह्या आहेत. The tap water scheme pipe was stolen