शृंगारतळीत मन की बातचा जाहीर कार्यक्रम
गुहागर, ता. 28 : संविधान दिनानिमित्त भाजपने गुहागर तालुक्याची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत माजी आमदार व गुहागर विधानसभा अध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या हस्ते संविधानाचे पूजन करण्यात आले. तसेच 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात शहीत झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा मन की बात कार्यक्रम पाहीला. Mann Ki Baat program at Sringaratali
गुहागर भाजपची तालुका कार्यकारणीची घोषणा करण्यासाठी 26 नोव्हेंबरला शृंगारतळी येथील ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या निमित्ताने संविधान पूजन, श्रध्दांजली, मन की बात अशा विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी आमदार डॉ.विनयजी नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान पूजन करण्यात आले. त्याचबरोबर 26 /11 /2008 रोजीच्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक भारतीयांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या आणि जगप्रसिद्ध झालेल्या सन्मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम पाहण्यात आला. Mann Ki Baat program at Sringaratali