जि. प. जीवन शिक्षण शाळेतील ४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
गुहागर, ता. 02 : सन 2022- 23 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. सदर परीक्षेत जि. प. जीवन शिक्षण शाळेतील एकूण ४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. The success of Jeevan Shikshan School continues

शाळेतील एकूण १९ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. त्यापैकी १७ विदयार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये कु.सोहम समीर बावधनकर याने शहरी विभागातून जिल्हयात १८वा क्रमांक पटकावला आहे. कु.अभिनव मनोज शिंदे या विद्यार्थ्याने शहरी विभागातून जिल्ह्यात 71 वा., कु.वेदांत रमाकांत लाड या विद्यार्थ्याने शहरी विभागातून जिल्ह्यात 63 वा, तर ऋतुजा नितीन सावळे या विद्यार्थिनींने शहरी विभागातून जिल्ह्यात 101 वा क्रमांक पटकावला आहे. तसेच कु.सोहम समीर बावधनकर या विद्यार्थीची नवोदय विद्यालय पडवे ( राजापूर ) येथे निवड झाली आहे. The success of Jeevan Shikshan School continues

त्यांच्या या यशाबद्दल गुहागर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम. लीना भागवत मॅडम, विस्ताराधिकारी श्री अशोक गावणकर, केंद्रप्रमुख श्री नामदेव लोहकरे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, गुहागर नं. १, शाळेचे मुख्याध्यापक श्री ईश्वर वासावे सर, माजी मुख्याध्यापिका हिरवे मॅडम, शाळेतील सर्व शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थी या सर्वांनी सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक श्री अमोल धुमाळ सर यांचे अभिनंदन केले आहे. The success of Jeevan Shikshan School continues
