गुहागर, ता. 21 : गुहागर खालचापाट येथील इयत्ता पाचवी मध्ये शिकणाऱ्या कु. स्पर्श योगेश गोयथळे याला खेळताना पैंशांचे पाकीट मिळाले. या मिळालेले पॉकेटमध्ये ५ हजार रुपये होते. ते संबंधित व्यक्तीला परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. स्पर्श याच्या या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. The sincerity of Sparsh Goythale
स्पर्श हा शहरातील श्री देव गोपाळ कृष्ण माद्यमिक विद्यामांदिरमध्ये इयत्ता पाचवीत शिकत आहे. खालचापाट येथील होळीचे मैदानावर बुधवारी मुलांसोबत खेळत असताना त्याला पैशांनी भरलेले कोणाचे तरी पॉकेट सापडले. त्याने ते पॉकेट उचलून घरातील व्यक्तींना दाखवले. या पॉकेट मध्ये ५ हजार रुपये होते. सदरील पॉकेट असगोली येथील मनोहर नाटेकर यांचे असल्याचे आतील कागदपत्रांवरून समजले. त्यांनी श्री. नाटेकर यांना संपर्क साधून आपले पैशांचे पाकिट मिळाल्याचे सांगितले. मनोहर नाटेकर जेव्हा ते पॉकेट घेऊन जाण्यासाठी आले तेव्हा म्हणाले. घरी जाऊन सगळीकडे पॉकेट शोधले कुठेच सापडले नाही. पैशांबरोबरच आतमध्ये महत्त्वाची कागदपत्रे होती. खरचं तुमच्या स्पर्शचे मनापासून कौतुक वाटते, असे त्यांनी सांगितले. सदरील पॉकेट नाटेकर यांना देण्यात आले. या शालेय विद्यार्थ्याने दाखवलेल्या प्रामाणिकपणा बद्दल उपस्थित ग्रामस्थांनी अभिनंदन केले. The sincerity of Sparsh Goythale